Mahad MIDC pollution : महाड एमआयडीसीत धुळीमुळे प्रदूषण वाढले

कारवाईबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ गप्प? रस्त्यांचीही वाताहात
Mahad MIDC pollution
महाड एमआयडीसीत धुळीमुळे प्रदूषण वाढलेpudhari photo
Published on
Updated on

महाड ः रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहती मधील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असतानाच महाड औद्योगिक वसाहती मधील अंतर्गत रस्त्यांन वरील खड्ड्यांनी व धुळीच्या साम्राज्याने कहर माजला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरून जाताना प्रश्न कामगार वर्गासहित वाहन चालकांना पडला आहे. रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र गप्प बसून बघ्याची भूमिका घेत असल्याने कारवाई कोणी व कोणावर करायची असा प्रश्न कामगार वर्गासहित वाहन चालकांना पडला आहे.

महाड औद्योगिक वसाहती कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रीट करण्याचे काम मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे असे असताना अंतर्गत रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पडले असताना व ते भरण्याचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ घेत नसल्याने संपूर्ण अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे.

Mahad MIDC pollution
Domestic violence arson : पत्नीसोबतच्या वादातून भाड्याचे घर पेटवले

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये बॉयलर साठी कोळसा घेऊन येणारे ट्रक हे. मांडे वडापाव जवळील ल्युब स्टार कंपनीजवळ ओव्हरलोड कोळसा वाहतूक करीत असल्याचे पाहण्यास मिळाले हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व धुरळा प्रचंड प्रमाणात असल्याने धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष पाहण्यास मिळाले.

ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था, औद्योगिक वसाहतीतील सर्वच अंतर्गत रस्त्यावर पाहण्यास मिळत आहे मात्र ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारे ट्रक नागोठण्यापासून महाड पर्यंत येत असताना नागोठण्याजवळ तसेच सुकळी खिंडीमध्ये व महाड येथील केभुर्ली जवळ महामार्ग सुरक्षा वाहतूक पथक असताना या वाहतूक शाखेला ओव्हरलोड वाहतूक करणारे कोळशाचे ट्रक दिसत नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अन्य वाहन चालकांवर कारवाई करणारे महामार्ग सुरक्षा पथक या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या कोळसा ट्रक चालकांवर कधी कारवाई करणार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना देखील महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड कोळसा वाहतुकीचे ट्रक वाहतूक करीत असताना दिसत नाहीत का असा सवाल वाहन चालक व प्रवासी वर्ग विचारीत आहे.

Mahad MIDC pollution
Thane Crime : देसाई खाडीपात्रात सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाचे उकलले गूढ

एकंदरीत अवजड वाहनांच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक केल्याने औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तसेच या रस्त्यांवर पडलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे प्रदूषणात वाढ होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ गप्प का असा सवाल या परिसरातील जनता प्रदूषण नियंत्रण महामंडळाला विचारत आहे.

खराब रस्त्यामुळे धुळ वाढली

महाड औद्योगिक वसाहती मधील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेच आहे मात्र अंतर्गत रस्त्यांवर धुळीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ झाली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र गप्प का असा सवाल कामगार वर्गासहित वाहन चालक विचारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news