

महाड : महाड औद्योगिक वसाहती मधील फायर स्टेशन लगत असलेल्या वजन काटा येथे आलेल्या कंटेनर मधील भंगाराला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात प्रार्थमिक रित्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार एम एच 48 ए वाय 0932 हा कंटेनर महाड औद्योगिक वसाहती मधील काही कारखान्यातून भंगार घेऊन मुंबईच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात आले.
एमआयडीसी मधील फायर स्टेशन लगत असलेल्या वजन काटा केंद्रावर हा कंटेनर उभा असताना त्यातून धूर व आगीच्या ज्वाला येत असल्याचे निदर्शनास आले.
एमआयडीसी फायर स्टेशन ने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले असून यासंदर्भात पुढील तपास महाड एमआयडीसी पोलिसांकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.