

महाड: महाड औद्योगिक वसाहतीमधील इंडो अमाईन्स कंपनीमधील शनिवारी झालेल्या ट्रायफॉसजीन या विषारी वायूच्या गळतीमुळे समोरील विरल कंपनीमध्ये काम करणारे कामगार कल्पेश वांद्रे यांचा मृत्यू झाला.
मृत वांद्रे यांच्या कुटूंबास ५० लाख रुपयांची मदत आणि मृत वांद्रे यांच्या पत्नीला कायमस्वरुपी महिना ११ हजार रुपये पेन्शन त्याच बरोबर मुलांच्या भवितव्यासाठी योग्य तो विचार करण्याचा निर्णय इंडो अमाईन्स कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे.
दरम्यान याच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले दुसरे कामगार अमित राज यांच्याही कुटूंबास नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे. वांद्रे कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळण्यासाठी कुटूंबियांस बोरगाव ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसी पोलीस ठाण्याला गराडा घातला होता.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांची होती. अखेर कंपनी व्यवस्थापनाने वांद्रे कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत जाहिर केल्यावर ग्रामस्थांनी निर्णय मान्य करुन आंदोलन मागे घेतले.
महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या रसायन कंपनीत शनिवारी १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता झालेल्या ट्रायफॉसजीन वायू गळतीच्या घटनेत अमितकुमार राज यांचाही मृत्यू झाला. ते मुळचे बिहार मधील असल्याने त्यांचा मृतदेह काल त्यांच्या मुळे गावी पाठविण्यात आला आहे. त्यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या नुकसान भरपाई व आर्थिक मदता बाबत कंपनी व्यवस्थापनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
बोरगाव गावातील स्थानिक रहिवासी असलेले कल्पेश वांद्रे याचा श्वास गुदमरल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये नेण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला. स्थानिक भूमिपुत्र असलेला बोरगाव गावातील कल्पेश वांद्रे यांच्या मृत्यूमुळे स्थानिक ग्रामस्थ इंडो अमाईन्स कंपनी विरोधात संतप्त झाले होते. त्यांनी कल्पेशचे पार्थिव स्वीकारण्यास नकार देवून कंपनी गेटवर