khopoli railway station crowd issue : खोपोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची घुसमट

फलाटावरुन बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग; गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीचा वाढता धोका
khopoli railway station crowd issue
अर्धे शेड, पडीक स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्लेटफार्मला चिकट झाले आहे. रेल्वे प्रशासनाने आधुनिकीकरणाच्या गप्पा मारणे बंद करा व केळवली डोळवली लौजी रेल्वे स्थानकांचा विकास करावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत(छाया- दिलीप पवार)
Published on
Updated on

खोपोली शहर : खोपोली रेल्वे स्थानकावर ना पादचारी पूल, ना विस्तिर्ण फलाट, स्थानकातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना अरुंद बोळातून जावे लागत असल्याने या स्थानकांवर परेल स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

खोपोलीचे वाढते नागरीकरण, निसर्गरम्य ठिकाण, प्रसिद्ध २ धबधबे, गगनगिरी महाराज आश्रम, जागतिक दर्जाचे ऍडलॅब इमाजिका थिमपार्क, बोरघाटातील मोहक दृश्य तसेच अलिबाग, पेण, पाली, सुधागड तर कधी कधी खंडाळा लोणावळा सफर खोपोलीतून केली जात असल्याने शनिवार रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी खोपोली फलाटावर तुफान गर्दी उसळत असते. खोपोली रेल्वे स्थानकावर एकच फलाट असल्याने मध्य रेल्वेच्या मुंबईतील परळ स्थानकावर चेंगरा चेंगरीची घटना घडली होती ती घटना पुन्हा मध्य रेल्वेच्या खोपोली फलाटावर घडल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे होईल का असा सवाल प्रवासी करीत आहेत.

khopoli railway station crowd issue
Murud garambi dam tourism development : मुरूड तालुक्यातील गारंबी धरणाचा पर्यटन दृष्टीने विकास व्हावा

तसेच खोपोलीत नागरिकांची आणि प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी वाढताना आहे. सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेन रेल्वे स्थानकावाहेरील रस्त्यावर प्रवाशांची मोठी वर्दळ निर्माण होत. वाहतूक कॉडीसोबतच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानक परिसरातील रस्ता अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करणे कठीण होते.

त्यातत पावसाळ्यात रस्त्यावर डबके, पाणीव अस्वच्छतेमुळे परिस्थिती आणखी विकट होत स्थानकावर येणाच्या-जाणाच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता स्थानक परिसरातील रस्ता रुंद करणे, पादचारी मार्गाची व्यवस्था करणे आणि वाहतूक नियोजन सुधारणे गरजेचे झाले आहे.

गर्दीच्या वेळेन वाहतूक नियंत्र-णासाठी आवश्यक उपाययोजना तसेच अतिक्रमणावर कारवाई होणे आवश्यक आहे. खोपोली शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना रेल्वे स्थानक परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आहे. शहराचा विस्तार, सुविधा अपुरा खोपोली शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना रेल्वे स्थानक परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

khopoli railway station crowd issue
vasai virar dengue malaria drive : डेंग्यू-मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी वसई-विरारमध्ये मोहीम

भविष्यात गर्दी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रवासी संघटनेची मागणी आहे. खोपोली बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी रस्ते अरुंद असल्याने ये-जा करणे कठीण, वाहतूक कोंडीचा त्रास स्थानक परिसरात पावसाळ्यात चिखल व अस्वच्छता पादचारी मार्गाचा अभाव, सुरक्षा रामभरोसे, वाहतूक नियंत्रणाची कमतरता, अति-क्रमणाची समस्या अशा गर्तेत स्थानक व परिसर सापडले आहे.

दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रशासनाने आधुनिकीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या. सरकत्या जिने फलाटावर लावले असले तरीही मध्य रेल्वेचे केळवली डोळवली लौजी रेल्वे स्थानक फलाटावर भटके कुत्रे, गुर ढोरांचा वावर असतानाच केलवली डोळवली रेल्वे स्थानक फलाट, प्लॉट फॉर्म पावसाच्या पाण्याने फलाटावर शेवाळ आले असल्याने फलाटाला घसरगुंडीचे रुप आले आहे. प्रवासी, विद्यार्थी यांच्यासह लहान मुले घसरुन पडत आहेत. तर रेल्वे प्रशासनाने निसरड्या फलाटावर पावडर मारण्यात येईल असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news