Raigad politics : महाड निवडणूक रायगडचे राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप युतीचे शिवसेनेसमोर कडवे आव्हान,आरोपांच्या फैऱ्या
Raigad politics
महाड निवडणूक रायगडचे राजकारण
Published on
Updated on

श्रीकृष्ण बाळ

महाड : सुमारे साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रशासकीय राजवट असलेल्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल रायगडचे राजकारण बदलून टाकणारे ठरतील असे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहे.

Raigad politics
Raigad News : पनवेल वाहतूक पोलिसांकडूनच नियमभंग !

या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे व स्नेहल जगताप यांच्या विरोधात मंत्री भरत गोगावले यांच्यात तीव्र संघर्ष होईल असे मानले जात आहे. दरम्यान या जिल्ह्याचे राजकारण बदलणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरेल असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 12 ऑगस्ट 1866 रोजी स्थापन झालेल्या महाड नगरपरिषदेची शेवटची सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये झाली होती 2021 रोजी कार्यकाळ संपल्यानंतर आज पावेतो राज्यातील 246 नगरपरिषदांमध्ये प्रमाणेच महाडमध्ये प्रशासकीय राजवट सुरू होती.

येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणुका संपन्न होणार असून आजपासून केवळ दहा दिवसांचा कालावधी बाकी राहिला असून मागील चार दशकांपेक्षा जास्त काळातील राजकीय आढावा पाहता ही निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून कोणत्याही परिस्थितीत नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्याचा चंग या दोन्ही पक्ष नेतृत्वाने बांधल्याने महाडमधील मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपली ताकद टाकतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीमध्ये या निवडणुकीत आलेली मनभेदाची दुरी स्पष्टपणे पहावयास मिळत असून या तीन दशकात महाड नगर परिषदेमध्ये भाजपचा एकही प्रतिनिधी निवडून न गेल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असलेली चलबिचल महायुती मधील दुसऱ्या घटक पक्षाची साथ घेत भाजपला फायदेशीर ठरेल अशी शक्यता निर्माण झाल्याने या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर युती केली आहे.

दरम्यान महाड शहरात व तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ही ताकद लक्षणीय असून शहराच्या विविध भागांमध्ये असलेल्या या मतांची ताकद अजमावून पाहण्याचा प्रयत्न या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरच दावा करीत अन्य एका प्रभागांमध्ये उमेदवारी लढविण्याचा घेतलेला निर्णय शिवसेनेला कितपत मारक ठरतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या वर्षभराच्या काळात लोकसभा निवडणुकी पश्चात महाड शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये डेरे दाखल झाले आहेत हे लक्षात घेता या निवडणुकीत देखील महाड शहरातील झालेली ही पक्षांतराची लाट आता थांबविणे राष्ट्रवादी काँग्रेसला अशक्य होऊन बसले असल्याचे वास्तववादी चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

2011 रोजी करण्यात आलेल्या जनगणनेनुसार महा शहराची लोकसंख्या सत्तावीस हजार असून मतदारांची संख्या 23 हजार 134 एवढी आहे. मागील निवडणुकीपेक्षा सुमारे 6000 मतांची वाढ झाली असून यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्यांची संख्या जवळपास 3000 असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून प्राप्त झाली आहे. शिवसेनेने कधी नव्हे एवढी साम दाम दंड भेदाची ताकद मंत्री भरत गोगावले य विकास गोगावले यांची रणनीती विजय प्राप्त करून देण्यास फायदेशीर ठरेल असा विश्वास शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.

Raigad politics
Raigad News : रोहा नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी‌‘काटे की टक्कर‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news