Mahad Political Clash | महाडमध्ये राष्ट्रवादी–शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा; मतदान प्रक्रियेत तणाव

Mahad Political Clash | महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
Mahad Political Clash
Mahad Political Clash
Published on
Updated on

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. महाड शहरातील निवडणुकीला दुपारी सव्वाच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला.

Mahad Political Clash
Matheran Municipal Election | माथेरान नगर परिषद निवडणूक : मतदानादिवशीच ५ लाखांची रोकड पकडल्याने खळबळ

नवे नगर शाळा क्रमांक ५ येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विकास गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे आणि त्यांच्या पथकाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप गोगावले यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना गोगावले म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नादरम्यान आपल्यावर रोखलेले रिव्हॉल्वर जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला असून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

Mahad Political Clash
New school recognition policy : शासनाच्या नवीन संचमान्यता धोरणामुळेे ग्रामीण भागात शाळा बंद पडणार

राष्ट्रवादी नेत्या स्नेहल जगताप यांचा आरोप

या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या विधानसभा नेत्या स्नेहल जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काल (सोमवार) रात्रीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाडमध्ये येत होते. आजचा प्रकार जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आरोप–प्रत्यारोपांना अधिक जोर आला आहे.

महाड पोलिसांचा कडक बंदोबस्त

घटना समजताच पोलिसांनी मतदान केंद्रासह संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news