Dog Attack: चोचिंदेत पिसाळलेल्या श्वानाचा सात बालकांवर हल्ला; एक बालिका गंभीर

महाड तालुक्यात गेल्या महिनाभरात 204 घटना
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on
Updated on
Summary

सोमनाथ भाऊ मित्र मंडळाचे सहकारी कल्पेश वनगुले व हभप माऊली खेडेकर या दोघांनी सरकारी रुग्णालयात जाऊन या घटनेमध्ये सापडलेल्या मुलांची भेट घेऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्यांच्यासंदर्भात चौकशी केली. यासंबंधीत जखमी मुलांची नावे निकलेश सुतार, वेदांत मोहिते, अनिकेत सुतार, विनायक सकपाळ अशी नावे असल्याचे सांगण्यात आले.

महाड: महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चोचिंदे गावात सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. आतापर्यंत अंदाजे 5 ते 7 जणांना कुत्र्याने चावले असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एक 6 वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर जखमी नागरिकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वेदांत अजय मोहिते (वय 5 वर्षे, रा. चोचिंदे) याचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयात भेट दिल्याप्रसंगी या संदर्भात अधिक चौकशी केली असता मागील मार्च महिन्यात एकूण 204 जणांना तालुक्यात कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली सदरची बाब ही अत्यंत चिंताजनक बाब असून. यावरून परिसरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट होते.

Dog Attack
Hirakot Fort Museum: हिराकोट किल्ल्यात साकारणार ऐतिहासिक संग्रहालय

या प्रकारानंतर लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नका. भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. कुत्रा पिसाळलेला दिसल्यास तात्काळ ग्रामपंचायत / प्रशासनाला कळवा. कुत्र्याने चावल्यास लगेच जखम स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवा आणि तातडीने रुग्णालयात उपचार घ्या. या संदर्भातील अँटि रेबीज इंजेक्शन घेणे अत्यावश्यक आहे याकडे संबंधित कुटुंबातील लोकांनी दुर्लक्ष करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. चोचिंदे गावातील घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासना मार्फत परिसरातील चोचिंदे व परिसरात तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news