Hirakot Fort Museum: हिराकोट किल्ल्यात साकारणार ऐतिहासिक संग्रहालय

रघुजीराजे आंग्रे यांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्वतः मान्यता; अलिबागचा इतिहास एका छताखाली
Hirakot Fort Museum
Hirakot Fort MuseumPudhari
Published on
Updated on

जयंत धुळप

रायगड: अलिबागचे ऐतिहासिक वैभव असलेल्या आणि आंग्रेकालीन पराक्रमाची साक्ष देणाऱ्या हिराकोट किल्ल्याचा आता कायापालट होणार असून या किल्ल्यामध्ये एक सुसज्ज ऐतिहासीक संग्रहालय अर्थात दर्शक दीर्घा(हिस्टॉरीकल म्यूझीयम गॅलरी) निर्माण करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

हिरोकोट किल्ला दर्शक दीर्घा ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना सांगून ती अमलात आणण्याकरिता आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संकल्पनेचे स्वागत करुन आवश्यक तांत्रिक बाजू तपासून प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असे सांगीतले असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी पूढे सांगीतले. अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांना या परिसराचा समृद्ध वारसा एकाच छताखाली अनुभवता यावा, हा यामागचा आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले.

Hirakot Fort Museum
Samagra Shiksha scheme: रायगड जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजना अखेर बंद; 115 कर्मचारी बेरोजगार

हिराकोट कारागृहाचे रुपांतर होणार ऐतिहासीक संग्रहालयात

हिराकोट किल्ला ही केवळ एक वास्तू नसून मराठा आरमाराचे महसूल केंद्र म्हणून त्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सध्या या किल्ल्याचा वापर जिल्हा कारागृह म्हणून केला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांना अटक केल्यावर या हिराकोट किल्ल््यात ठेवण्यात येत असे, मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गुन्हेगारांना अटक करुन ठेवण्याकरिता येथे कारागृह करण्यात आले. शासनाने मागील कार्यकाळात अलिबाग तालुक्यातील परहुर येथे येथे तुरुंगासाठी नवीन भूखंड आरक्षित केला आहे.

तुरुंग प्रशासनाने या जागेची मोजणी करून ती ताब्यातही घेतली आहे. त्यामुळे हिराकोट किल्ल््यातील तुरुंग या नवीन जागेत स्थलांतरीत करणे आता तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले आहे.ऐतिहासिक किल्ल््याचा वापर तुरुंग म्हणून करण्याऐवजी तिथे उत्तम प्रकारची दर्शक दीर्घा बनवल्यास, या परिसराचा गौरवशाली वारसा पुढील पिढीसमोर आदर्श स्वरूपात मांडता येईल, अशी संकल्पना असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगीतले.

Hirakot Fort Museum
Accident News: मुंबई-गोवाअपूर्ण महामार्गाने घेतले 15 वर्षात 1285 जणांचे बळी

प्रस्तावित दर्शक दीर्घेमध्ये अलिबाग आणि परिसरातील विविध पैलूंचे दर्शन घडवले जाणार आहे. आंग्रे कालीन इतिहास, ऐतिहासिक घटना आणि राजकीय स्थित्यंतरे, अलिबाग अष्टागारातील समाजजीवन, सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक मानबिंदूंची ओळख, परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी संपदा आणि दुर्मिळ पक्षी यांची माहिती, भूतकाळासोबतच वर्तमान काळातील अलिबागची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे अशी परिपूर्ण माहिती येथे उपलब्ध करुन देण्यात येईल.

बहुभाषिक साऊंड शो

पर्यटकांच्या आकर्षणासाठी किल्ल्याच्या मधल्या मोकळ्या जागेत एक मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील साऊंड शो आयोजित करण्याचा मानस आहे. या माध्यमातून अलिबागचा गौरवशाली इतिहास ध्वनी आणि प्रकाशाच्या माध्यमातून पर्यटकांसमोर उलगडला जाईल. तसेच, या प्रकल्पाचा एक भाग म्हणून एक सोविनियर शॉप येथे देखील उभारले जाणार आहे. यामुळे पर्यटकांना अलिबागच्या रम्य आठवणी आणि स्थानिक वस्तू आपल्यासोबत नेता येतील, ज्यातून स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकणार आहे.

सध्याच्या कारागृहातील बेरेक्सचा होणार कल्पक वापर

हिराकोट किल्ल््याच्या अंतर्गत भागात सध्या असलेल्या बेरेक्समध्ये हे ऐतिहासीक प्रदर्शन मांडता येऊ शकते. यामुळे किल्ल्याच्या मूळ वास्तूला धक्का न लावता ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन देखील होईल,असे आंग्रे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news