Mahad Crocodile Sightings: नातेमध्ये भरवस्तीत सहा फुटी मगर; सिस्केप संस्था,वन विभाग यांचे बचावकार्य यशस्वी

कोर्थुर्डे धरणातील जलचर प्राणी मानवी वस्तीत
Mahad Crocodile Sightings
Mahad Crocodile SightingsPudhari
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते: गेल पंधरा दिवस सातत्याने नाते पुढील कोथुर्डे पंचक्रोशी परिसर येथे अनेक वेळा मगर मानवी वस्तीमध्ये येणे तसेच गावाकडील रस्त्यावर चालताना निदर्शनास पडणे अशा घटना घडत आहेत.

सिस्केप संस्था महाड सदस्य आणि महाड वनविभाग यांच्या यशस्वी प्रयत्नाने त्यांना सुखरूप त्यांच्या परिस्थितीकी वातावरणात सोडले जात आहे. प्रसार माध्यमांच्या सहकार्याने या कामी गावोगावी मगर या प्राण्याबद्दल भीती व गैरसमज दूर झाल्याचे दिसते. आता थेट गावकरी सिस्केप सदस्यांना संपर्क साधत मगरीचे संरक्षण करताना दिसत आहेत.

Mahad Crocodile Sightings
Konkan Railway Upgrade: कोकणरेल्‍वे मार्गाचे दुपदरीकरण होणार

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास नाते, टाकीची आळी येथे दत्त मंदिर शेजारी श्री. बाबू सावंत यांच्या घराजवळ रस्त्यावर मगर आल्याची माहिती मिळाली.ही मगर ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरज जामदार, सुधाकर गायकवाड, रुपेश पवार, गणेश सावंत आणि प्रवीण गायकवाड आदी तरुणांनी सुरक्षितरीत्या पकडून ठेवली होती.

सिस्केप संस्थेचे गणेश खातू यांनी टीमच्या सदस्यांना संपर्क साधला. त्यानंतर संस्थेचे सदस्य गणेश खातू, चिराग मेथा, स्मरण शिंदे, ओम शिंदे, धर्मेश मेथा आणि योगेश गुरव हे रेस्क्यूसाठी लागणारे सर्व साहित्य व उपकरणे घेऊन घटनास्थळी पोहोचले.

सदर मगर ही मार्श क्रोकोडाइल (गोड्या पाण्यातील मगर) असून तिची लांबी 5 फूट 9 इंच होती. टीम घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी मगर अन्यत्र जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तिला दोरीच्या सहाय्याने सुरक्षितरीत्या पकडून ठेवले होते.

घटनास्थळी वनक्षेत्रपाल महाड श्री. आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मगरीचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. यावेळी वनपाल महाड श्री. संदीप उतेकर, वनरक्षक महाड श्री. अंगद भोसले तसेच वनरक्षक नाते श्री. आदित्य भोसले हे उपस्थित होते. आवश्यक कार्यवाही पूर्ण करून मगरीला कोणतीही इजा न होता तिच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

Mahad Crocodile Sightings
Thane Water Cut: गुरूवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद

या संपूर्ण बचाव कार्यात ग्रामस्थ, वनविभाग कर्मचारी आणि सिस्केप संस्थेच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे संभाव्य मनुष्य–वन्यजीव संघर्ष टळून मगरीचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात यश आले.

वन्यप्राणी आढळल्यास घाबरु नका

वनविभाग महाड आणि सिस्केप संस्था महाड नागरिकांना आवाहन करतात की, वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता अथवा त्यांना कोणतीही इजा न पोहोचवता त्वरित वनविभाग आणि सिस्केप संस्था महाड अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news