

महाड ः आम्हाला शिवशाही बस द्या नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत करा संतप्त प्रवाशांची एसटी व्यवस्थापनाकडे मागणी केल्याची घटना समोर आली आहे.
9 मे 2026:रोजी महाड एसटी स्थानकात एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ऑनलाइन बुकिंग करून शिवशाही बसचे तिकीट घेतलेल्या प्रवाशांना ऐनवेळी साधी लाल डबा एसटी लावण्यात आली.
प्रवाशांचा आरोप आहे की वारंवार शिवशाही बुकिंग असूनही साधी बस दिली जाते. “शिवशाहीचे पैसे भरून आम्ही जुन्या एसटीत का बसायचं?“ असा सवाल प्रवाशांनी केला. ऑनलाइन बुकिंगचे पैसे रिफंडही होत नसल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे.या प्रकारामुळे महाड एसटी स्टँडवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
“आमचे तिकिटाचे पैसे आम्हाला परत करा“ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. महाड आगारातून वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये महामंडळाविरोधात नाराजी वाढली आहे. याबाबत आगार व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशी माहिती या प्रवासी वर्गातून देण्यात आली.
या संदर्भात महाड आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.