महाड: पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिथरलेला रेडा जेरबंद

तीन वाहनांना ठोकर, ६ जण जखमी
Mahad  News
महाड येथे पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिथरलेल्या रेड्याला पकडण्यात आले. Pudhari News Network

महाड; पुढारी वृत्तसेवा : जनकल्याण रक्तपेढी येथून बिथरलेल्या रेड्याने चांभार खिंड पर्यंत धाव घेताना वाटेतील तीन वाहनांना ठोकर देऊन सहा नागरिकांना जखमी केले होते. ही घटना आज (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, या रेड्याला पाच तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वनखाते, आरोग्य विभाग, पशु विभाग, पोलिसांना यश आले.

Mahad  News
महाड : देशमुख कांबळे गावात गोठ्याला भीषण आग; ९ जनावरे जळून खाक!

रेडा चांभार खिंड परिसरातील डोंगरामध्ये फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर विविध विभागांनी संयुक्तरित्या केलेल्या मोहिमेमध्ये रेड्याला पकडण्यात यश आले. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, रेड्याने जखमी केलेल्या सहापैकी तीन जणांच्या जखमा गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Mahad  News
महाड औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीला जाणाऱ्या ४ कामगारांना टेम्पोने उडविले; दाेघांचा मृत्‍यू

महाडमधील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news