महाडमध्ये उधळलेल्या रेड्यामुळे वाहनधारक सैरभैर; ६ जण जखमी

पशुवैद्यकीय विभाग, शहर पोलिसांची तारांबळ
Mahad News
महाड शहरात एका उधळलेल्या रेड्याने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केले. Pudhari News Network

महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड शहरात एका उधळलेल्या रेड्याने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केले. ही घटना आज (दि.८) सकाळी साडेअकराच्या सुमारास काकरतळे ते एसटी स्टँड, चांभार खिंड परिसर मार्गावर घडली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mahad News
महाड : देशमुख कांबळे गावात गोठ्याला भीषण आग; ९ जनावरे जळून खाक!

Summary

  • महाड शहरात उधळलेल्या रेड्याचा धुमाकूळ

  • काकरतळे, एसटी स्टँड, चांभार खिंड परिसरात भीतीचे वातावरण

  • अनेक जखमी, वाहनांचे नुकसान,

  • पशुवैद्यकीय विभाग, शहर पोलिसांकडून रेड्याची धरपकड सुरू

Mahad News
महाड औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीला जाणाऱ्या ४ कामगारांना टेम्पोने उडविले; दाेघांचा मृत्‍यू

जखमींची नावे

विजय उर्फ भाऊ चव्हाण, अजय चव्हाण, नीमेश राठोड, आरती जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर खासगी तसेच महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mahad News
महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग

२ वाहनांचे नुकसान

उधळलेल्या रेड्याने शहरातील जनकल्याण रक्त केंद्र, बँक ऑफ इंडिया या मार्गाने जात एसटी स्टँडच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी रेड्याने अनेकांना धडक देत २ वाहनांचे देखील नुकसान केले. त्यानंतर पशुवैद्यकीय विभाग आणि महाड शहर पोलिसांनी रेड्याला पकडण्याची मोहीम राबविली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news