Loan Fraud Gang | कर्ज मंजुरीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा रोहा पोलिसांकडून पर्दाफाश; दोन आरोपी गजाआड!

Loan Fraud Gang | रोहा पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

वरसे : नितीश सकपाळ
व्यवसायिक आणि वैयक्तिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ओमकार रविंद्र हटले (वय ४०, रा. बदलापूर-ठाणे, मूळ रा. गोठणे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) व गौरव संतोष मयेकर उर्फ भालचंद्र रघुनाथ पालव (वय ३४, रा. उलवे - नवी मुंबई, मूळ रा. मठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या दोघां सराईत आरोपींना १५ ऑगस्ट रोजी पहाटे रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने नवी मुंबई व पनवेल परिसरातून अटक केली आहे.

Arrested
Maharashtra weather update : रायगड -पुणे -सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून ५ लाख रुपये किमतीची हुंदाई वेन्यू कार, ५० हजार रुपये रोकड आणि १ लाख रुपये किमतीचे मोबाईल, बनावट पतसंस्थेचे शिक्के, पावती पुस्तके, रिसीट बुक आणि इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूडकोली, रोहा येथील तक्रारदार लियाकत महंमद खोत (वय ७०) यांनी वर्तमानपत्रातील समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेसची कर्जविषयक जाहिरात पाहून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता.

Arrested
Maharashtra weather update : रायगड -पुणे -सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

आरोपींनी त्यांना २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध कारणांसाठी तक्रारदाराकडून ४५ हजार ४०० रुपये घेतले आणि बनावट पतसंस्थेचे शेअर्स व कर्ज मंजुरीचे खोटे कागदपत्रे देऊन फसवणूक केली.
तपासादरम्यान आरोपींनी रोहा परिसरातील इतर २३ जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींवर नवी मुंबई व ठाणे परिसरात फसवणुकीचे ७ गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, पोलीस अंमलदार कैलास बेल्हेकर, अनिल पाटील व अमित चाळके यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

महत्त्वाचे मुद्दे

  • अटक आरोपी : ओमकार रविंद्र हटले (वय ४०, बदलापूर) आणि गौरव संतोष मयेकर उर्फ भालचंद्र रघुनाथ पालव (वय ३४, उलवे).

  • जप्त मुद्देमाल : ५ लाखांची हुंदाई वेन्यू कार, ५० हजार रुपये रोख, १ लाखाचे मोबाईल, बनावट पतसंस्थेचे शिक्के व पावती पुस्तके.

  • फसवणुकीची पद्धत : वर्तमानपत्रात 'समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस' नावाने जाहिरात देऊन कर्ज मंजुरीच्या नावाखाली प्रोसेसिंग फी व बनावट शेअर्सद्वारे रोह्यातील २३ हून अधिक नागरिकांची फसवणूक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news