Leprosy detection campaign 2025 : रायगड जिल्ह्यामध्ये 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरोग शोध मोहीम

आशासेविका-स्वयंसेवक पाच लाख घरांना देणार भेटी; 23 लाख 30 हजार लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण
Leprosy detection campaign 2025
रायगड जिल्ह्यामध्ये 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरोग शोध मोहीमpudhari photo
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे. 2027 पर्यंत जिल्हयात कुष्ठरोग्याची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे 100 टक्के व शहरी भागातील जोखीमग्रस्त 30 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना आशा सेविका व स्वयंसेवक भेटी देणार असून एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Leprosy detection campaign 2025
Baby kidnapping case : कल्याण रेल्वेस्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

शरीराच्या कुठल्याही भागावर फिकट लालसर न खाजणारा बधीर चट्टा-डाग, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट त्वचा, त्वचेवर लहान लालसर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल निसटणे, हाताची व पायाची बोटे वाकडे असणे, हात मानेपासून पाय घोट्यापासून लुळा पडणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे 100 टक्के व शहरी भागातील जोखीमग्रस्त 30 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना आशा सेविका व स्वयंसेवक भेटी देणार असून एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 1 हजार 995 पथके व 375 पर्यवेक्षवा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्या रायगड जिल्ह्यामध्ये 390 कुष्ठरुग्ण औषधोपचाराखाली आहे.

Leprosy detection campaign 2025
Matheran mini train : अखेर मुहूर्त मिळाला.... गुरुवारपासून मिनीट्रेन धावणार

मोहिमेचा उद्देश

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार रोखणे, हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जंतूमुळे होतो. या जंतूमुळे त्वचेवर, नास्तवर आणि शरीराच्या नसा इतर अवयवावर परिणाम होतो.

मोहिमेदरम्यान आशा सेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण शोधणार असून नागरिकांनी आजाराबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. तसेच जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसूत्रीने कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वी करावे.

नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news