

महाड : श्रीकृष्ण बाळ
मागील सुमारे एक वर्षाच्या काळापासून महाड तालुक्याच्या विविध विभागात बिबट्याचा वावर सुरू झाल्याचे निदर्शनास आले होते काही दिवसापूर्वीच या संदर्भात महाड वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यात २५ पेक्षा जास्त बिबटे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आल्याने याचे गांभीर्य वाढले असून तालुक्यातील ६० पेक्षा जास्त जनावरांचा या बिबट्याने केलेला फडशा लक्षात घेता आगामी काळात मनुष्यहानी होऊ नये या पार्श्वभूमीवर या बिबट्यांच्या वावराबाबत वन खात्याने अधिक गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
महाड तालुक्याच्या रायगड विन्हेरे भागात प्रामुख्याने मागील काही महिन्यात या संदर्भात झालेल्या घटना व जनावरांची झालेली हत्या लक्षात घेता वनखात्याकडून संबंधित गावातील नागरिकांना सुरक्षितते संदर्भात उपायोजनाची गरज गांभीयनि जाणू लागली आहे.
या संदर्भात या क्षेत्रातील मान्यवरांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बिबट्यांची जनसंख्या वाढल्याने त्यांना आवश्यक असलेल्या अन्नासाठी व पाण्यासाठी नागरी वस्ती कडे घेत असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात महाड तालुक्यातील विविध ग्रामस्थांनी वनखात्याकडे केलेल्या तक्रारी संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी वनाधिकाऱ्यांशी भेट घेतली असता त्यांनी महाड तालुक्यात २५ पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर असल्याचे मत नोंदविले.
मागील काही आठवड्यात गोंडाळे विन्हेरे भागात नागरिकांना रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात कधीही बिबटे अथवा वाघ दिसून आला नसल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त झाली.
वन खात्याने या संदर्भात एक विशेष मोहिमेद्वारे या बिबट्यांना पकडून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या गावातील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे. मागील काही वर्षात रानांचा झालेला नाश या सर्व प्राण्यांचा जनमानसातील वावरामध्ये झाल्याची प्रतिक्रिया काही अनुभवी नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षभरात सुरू झालेल्या या बिबट्यामुळे पाळीव प्राण्यांची होणारी हत्या त्यामध्ये मानवी हत्येमध्ये रूपांतरित होऊ नये या दृष्टिकोनातून वनखात्याने या घडी लक्ष द्यावे अशा सूचना केल्या जात आहेत.
नव्याने निर्माण झालेल्या महाड तालुक्यातील या समस्येकामी स्थानिक प्रशासन वन खात्याने तत्परतेने व गंभीरतेने नोंद घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रायगड जिल्हयातील काही तालुक्यात बिबट्यांचा वावर असल्याचे मागील काही वर्षात समोर आले आहे. जंगल क्षेत्र कमी होत असल्याने बिबटे नागनि वस्तीकडे येत आहेत.
बिबट्यांची संख्या वाढली
महाड तालुक्याच्या रायगड विन्हेरे भागात प्रामुख्याने मागील काही महिन्यात या संदर्भात झालेल्या घटना व जनावरांची झालेली हत्या लक्षात घेता वनखात्याकडून संबंधित गावातील नागरिकांना सुरक्षितते संदर्भात उपायोजनाची गरज गांभीर्याने जाणू लागली आहे. या संदर्भात या क्षेत्रातील मान्यवरांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बिबट्यांची जनसंख्या वाढल्याने त्यांना आवश्यक असलेल्या अन्नासाठी व पाण्यासाठी नागरी वस्ती कडे घेत असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.