‌Kundalika Boat Race Festival: ‘कुंडलिके‌’मध्ये फायबर, शिडवाल्या होड्यांच्या शर्यतींचा थरार

फायबर होडी स्पर्धेत किरण पोकळे यांची तर शिडांच्या होड्यांमध्ये गुरूदास कामत प्रथम
‌Kundalika Boat Race Festival
‌Kundalika Boat Race FestivalPudhari
Published on
Updated on

रेवदंडा : महेंद्र खैरे

एकविरा मातेचा नारळाची ओटी भरण्याचा निमित्ताने आयोजित पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतींचा थरार कुंडलिका समुद्र खाडीत असंख्य इंजिन होड्यांच्या जत्रौत्सवाने संपन्न झाला. या स्पर्धेत आग्राव येथील गुरूदास कामत यांची हिरावती शिडवाल्या होडीने प्रथम क्रमांक तर आग्रावमधील हरिश्चंद्र शेट्टी यांच्या हिरकणी शिडवाल्या होडीने व्दितीय क्रमांक पटकाविला. तर कोर्लईमधील कमलावती शिडवाली होडी तृतीय व पद्मावती शिडवाली होडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरल्या.

‌Kundalika Boat Race Festival
Umte Dam Water Crisis: उमटे धरण यावर्षी तरी गाळमुक्त होणार का ?

गुढी पाडव्याचे दुसऱ्या दिवशी प्रतिवर्षा प्रमाणे आग्राव दर्यातंरग मित्रमंडळ पूर्र्वापाडा आयोजीत शिडवाल्या होडयांची जंगी शर्यतीचा थरार आग्राव जेटी येथून दुपारी बारा वाजता सुरू झाला. या वर्षी एकूण आठ शिडवाल्या होडयांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर सोबतीला असंख्य इंजिन होडया स्थानिक कोळी बांधव व भगिनीसह पै-पाहूण्यासह कुंडलिका समुद्र खाडीत होत्या.

या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, संदिप घरत, जि.प. सदस्य सचिन राउळ, ओएनजेसी अधिकारी पंकज शेट्टी-कोळी, तन्मेश ज्वेलर्सचे उमेश मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे शिडवाली होंडीस 1 लाख रूपये व चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 55 हजार व चषक,तृतीय क्रमांकास 35 हजार रूपये व भव्य चषक तर चतुर्थ क्रमांकास उत्तेजनार्थ बक्षिसे मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

‌Kundalika Boat Race Festival
Mira Bhayander Budget 2026: मिरा-भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ

रोहा तालुक्यातील खारापटी येथे शर्यती

रोहे : महादेव सरसंबे

गुढीपाडवा निमित्ताने रोहा तालुक्यातील खारापटी येथील गणेश आळी मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित कुंडलिका नदी पात्रात रोमांचक झालेल्या फायबर होडी स्पर्धेत प्रथम क्रमांक किरण पोकळे (आई वैजयंती) यांनी तर लाकडी होडी स्पर्धेत निलेश चावरेकर (कमळादेवी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

‌Kundalika Boat Race Festival
Mumbai Drainage Cleaning: यंदाही मुंबईची ‘तुंबई’ची भीती; नालेसफाईत मोठा विलंब

या स्पर्धेचे बक्षीस वितरण रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, माजी सभापती राजश्री पोकळे, कोळी समाज अध्यक्ष जयवंत पोकळे, ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, माजी सरपंच राजेंद्र पोकळे, नगरसेवक देवेश जैन, उद्योजक सुनील चोरगे, ग्रामपंचायत सदस्या नयनीता डोलकर, नवनीत डोलकर, शेखर पाटील, मंडळाचे अध्यक्ष मिलनाथ नाईक, संतोष नाईक, मच्छिंद्र नाईक, नामदेव पोकळे, राकेश पाटील, अमोल पोकळे यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत फायबर प्रकारात द्वितीय क्रमांक सुशील डोलकर, तृतीय क्रमांक अक्षर डोलकर, चतुर्थ क्रमांक मारुती वाघमारे, पाचवा क्रमांक प्रकाश चौलकर, लाकडी होडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक लिलाधर चावरेकर यांनी पटकावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news