Korlai Village Water Shortage: कोर्लई येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांचे हाल

रस्ता रुंदीकरणाच्या कामात जलजीवन योजनेची पाइपलाइन बाधित; ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा
Korlai Village Water Shortage
Korlai Village Water ShortagePudhari
Published on
Updated on

रेवदंडा : महेंद्र खैरे

मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेले महिनाभर पाण्यावाचून ग्रामस्थांचे बेहाल झाले आहे. याबाबत कोर्लई ख्रिश्चनपाडा ग्रामस्थाची कोर्लई ग्रामपंचायतीत संवाद-चर्चा घडून आली.

कोर्लई गावात गेल्या महिनाभरात भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असून काही वर्षापुर्वी नव्याने जलजीवन पाणी पुरवठा योजना कार्यन्वित करण्यात आली आहे, कोर्लई गावात जनजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा फणसाड धरणातून केला जातो.

Korlai Village Water Shortage
Wada Highway Damage: कुडूस नाका येथे नव्या नाल्याला भगदाड; महामार्गावरील कामांमुळे वाहनचालक त्रस्त

सद्य:स्थितीत मुरूड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्यः रस्तावर रेवस-रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नुतनीकरण, क्राँकिटीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मांडला ते फणसाड धरण या मार्गात सुध्दा अनेक ठिकाणी नुतन रस्त्यासाठी खोदाई वगैरे कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ता रूंदीकरण,क्राँकिटीकरण व नुतनीकरण कामात खोदाई काम करताना ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने ठिकठिकाणी जनजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईपलाईन फुटली गेली. या फुटलेल्या पाईप लाईनची तात्पुरती दुरूस्ती केली जाते परंतु फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी झिरपत रहाते, परिणाम कोर्लई गावापर्यंत पाण्याचा प्रेशर पाणीपुरवठा करण्यास सुयोग्य होत नसल्याने कोर्लई गावात पाणी मिळत नाही. यामुळे एकप्रकारे कृत्रिम पाणी टंचाई कोर्लई गावात निर्माण झाली आहे.

Korlai Village Water Shortage
Jal Jeevan Mission Palghar: जिल्ह्यातील जलजीवन योजनेचे 242 कोटी थकले

अखेर या पाणीटंचाई समस्येवर कोर्लई ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामस्थ यांच्यामध्ये संवाद-चर्चा घडून आली. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच राजश्री मिसाळ यांचेकडे पाणी समस्येविषयी गाऱ्हाणे मांडले. यावेळी सरपंच राजश्री मिसाळ यांनी सध्यस्थितीत मुरूड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्यः रस्तावर रेवस-रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नुतनीकरण, क्रॉकिटीकरण व रूंदीकरचे काम सुरू आहे.

मांडला ते फणसाड धरण या मार्गात सुध्दा अनेक ठिकाणी नुतन रस्त्यासाठी खोदाई वर्गेरे कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ता रूंदीकरण, क्राँकिटीकरण व नुतनीकरण कामात खोदाई काम करताना ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने ठिकठिकाणी जनजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईप लाईन फुटली गेली. या फुटलेल्या पाईप लाईनची तात्पुरती दुरूस्ती केली जाते, परिणाम कोर्लई गावापर्यंत पाण्याचा प्रेशर पाणी पुरवठा होत नसल्याचे म्हटले.

Korlai Village Water Shortage
Palghar Train Accident: पालघरमध्ये मालगाडीची धडक; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

ख्रिश्चनपाडा ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा

कोर्लई -ख्रिश्चनपाडा येथील ग्रामस्थ व शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख विकी वेगस यांनी संबंधित खात्यांना कोर्लई गावातील पाणी पुरवठा समस्येबाबत पत्र दिले आहे. संबंधितांनी त्वरित लक्ष्य देवून पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत करण्यासाठी रस्ता नुतनीकरणाने व रूंदीकरणात पाईप लाईन विस्कळीत झाल्याने नव्याने पाईप लाईन करण्यात यावी अशी मागणी कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ यांनी केली आहे. दरम्यान कोर्लई ग्रामपंचायतीचे वतीने ख्रिश्चनपाडा ग्रामस्थांना टँॅकरने पाणी पुरवठा कोर्लई ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत असल्याचा खुलासा सरपंच राजश्री मिसाळ यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news