Wada Highway Damage: कुडूस नाका येथे नव्या नाल्याला भगदाड; महामार्गावरील कामांमुळे वाहनचालक त्रस्त

भिवंडी–वाडा महामार्गाचे काम संथ; एकेरी वाहतूक आणि कोंडीमुळे नागरिकांचा संताप
Wada Highway Damage
Wada Highway DamagePudhari
Published on
Updated on

वाडा : वाडा तालुक्यात एखादी सकारात्मक गोष्ट ऐकायला येणे म्हणजे मोठे भाग्य मानले जात असून रोज नवनवीन कारनाम्यांनी जनता त्रस्त झालेली आहे. मनोरवाडा भिवंडी या महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा लोकांचा आरोप आहे एका बाजूने खोदकाम करून ठेवलेली अर्धवट कामे तर काही ठिकाणी काँक्रीट रस्ता व दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक हा सध्या डोकेदुखीचा विषय बनला आहे एखादे वाहन हळू चालू लागले किंवा बंद पडले तर तात्काळ या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून रविवारी अशाच वाहतूककोंडीने कंचाड परिसरात मेगाब्लॉक बघायला मिळाला.

Wada Highway Damage
Jal Jeevan Mission Palghar: जिल्ह्यातील जलजीवन योजनेचे 242 कोटी थकले

भिवंडी - वाडा या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून कुडूस ते वाडा या भागात जोमाने सुरू असलेले काम देखील आता थंड पडले आहे. कंत्राटदार कंपनीने वाडा ते मनोर या महामार्गाचे काम देखील हाती घेतले असून या भागात मात्र काम अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. वाडा शहराजवळ गटारीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम आता अर्धवट सोडून कंत्राटदार गायब झाला आहे. पाली - पोशेरी व कंचाड या भागात पट्ट्यात होणारी एकेरी वाहतूक कोंडीत सापडली आहे. रविवारी या महामार्गावर वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या असून यामुळे वाहनचालक बेजार झाले आहेत.

Wada Highway Damage
Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; आई-मुलीचा मृत्यू, पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर

शिरीषपाडा, नेहरोली, कुडूस भागात जागोजागी संथ गतीने काम सुरू असल्याने वाहनांच्या रांगा बघायला मिळत असून कित्येक तासांच्या कोंडीने शहराकडे जाणारे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. परीक्षेच्या काळात शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत असून कंपनीला काही देणंघेणं नसल्याचा लोकांचा आरोप आहे. दुर्दैवी म्हणणे आमदार , खासदार व कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत ठेकेदार कंपनीला सवाल विचारायला तयार नसून लोकांनी करायचे तरी काय असा त्यांना प्रश्न पडला आहे.

Wada Highway Damage
Vasai Virar Municipal Corporation: मानापमान नाट्यानंतर इमारत लोकार्पण कार्यक्रम रद्द; प्रशासनाचा खुलासा पण महापौरांनी केले थेट उद्घाटन

नाल्याला भगदाड

महामार्गाचे काम जागोजागी सुरू असून बहुतांश नाक्यांवर गटारांची कामे हाती घेण्यात आली आहेत. कुडूसनाका भागात एकाठिकाणी गटाराला भगदाड पडल्याचे पहायला मिळाले असून अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नाल्यावर स्लॅब ची जाडी अंदाजपत्रकानुसार नसल्याचा आरोप असून कंपनी उप कंत्राटदारांना हे काम देते ज्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट होतो असा आरोप केला जात आहे. कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news