Konkan Railway Safety: पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर रात्रीची गस्त

प्रत्येक पाच किमी अंतरावरवॉचमन तैनात
Konkan Railway Safety
Konkan Railway SafetyPudhari
Published on
Updated on

रायगड: कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने प्रत्यक्ष रुळावर रात्रीची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरडींच्या धोकादायक क्षेत्रात 24 तास पहारेकरी (वॉचमन) तैनात ठेवण्यात येणार आहेत. नाईट पेट्रोलिंग ड्युटीवर असणारे कर्मचारी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्यांना नेमून दिलेल्या भागात पायी गस्त घालतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना वेगमर्यादा आखून देत रेल्वे प्रशासनाने अलीकडेच मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 15 जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे.

Konkan Railway Safety
Raigad ZP School: जि.प. शाळांत स्वच्छ पाण्याचा मुद्दा ऐरणीवर

त्यापाठोपाठ कोकण रेल्वेच्या सुरक्षा विभागाने रुळांवरील पावसाळी गस्तीबाबत सुरक्षा उपाययोजना कडक केल्या आहेत. कोकण रेल्वेचा बहुतांश मार्ग डोंगर-बोगद्यांतून जातो. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा येणे, दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे अशा घटना घडण्याची भीती असते. त्यापासून अपघाताचा धोका संभवत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या सुरक्षा विभागाने पावसाळी गाडीबाबत कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यपद्धती आखली आहे.

पावसाळी गस्तीसोबत अग्निसुरक्षेचे धडेकोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी गस्तीच्या कार्यपद्धतीबरोबरच ट्रॅकमॅन, पेट्रोलमॅन, पहारेकरी, स्टेशन मास्टर्स, तांत्रिक विभागातील पर्यवेक्षक, लोको पायलट व ट्रेन मॅनेजर्स यांना अग्निसुरक्षेचे धडे देण्यात आले आहे. याआधारे कोकण रेल्वेची यंत्रणा पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे.

Konkan Railway Safety
Mahad Crocodile News: कोर्थुडे धरणातील मगरी आल्या रस्त्यावर; पाणीसाठा आटल्याने अधिवासावर परिणाम

कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण

रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक पेट्रोलमॅनवर 5 किलोमीटरपर्यंतच्या मार्गाची (बीट) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेल्वेच्या या विशेष कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीतील मदत कार्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news