Monsoon Update 2026: कोकणात २० जूननंतरच वरुणराजा बरसणार

यंदा पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज ; पाणीटंचाईत वाढ
Konkan Rain Update
Rain UpdatePudhari
Published on
Updated on

ऋषिता तावडे

रायगड: जून 2026 पासून राज्यात पावसाचा अंदाज होता. मात्र,मोमसी पावसाने पुन्हा एकदा दिशा बदलली. मोसमी पाऊस अरबी समुद्रात आहे. अरबी समुद्रात त्याची वाटचाल थांबली आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वादळ्याने मोसमी पावसाला पुढे येण्यास अडथळा निर्माण झाला. जोपर्यंत हे वारे जाणार नाही, तोपर्यंत त्याची स्थिती जैसे थे असणार आहे,असे हवामान विभागाने जाहीर केलेले आहे.

Konkan Rain Update
Panvel Power Supply Issues: वीज ग्राहकांना देण्यात येणारी सेवा ही परिपूर्ण असावी; खा.श्रीरंग बारणे यांचे निर्देश

२० जूनला राज्यातील जवळपास भागात मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात उष्णता प्रचंड वाढताना दिसत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने ते एक वेगळे संकट आहे. एल निनोचा प्रभाव पावसावर असेल. ज्यामुळे अनेक भागात पाऊस कमी होऊ शकतो. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक हवामान संस्थांनी अगोदरच धोक्याचा इशारा दिला आहे.

Konkan Rain Update
Roha Fertilizer Scam: रोहा तालुक्यात खतांचा मोठा काळाबाजार उघड; कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा दाखल

मान्सूनच्या वाऱ्याने पश्चिम बंगालच्या काही भागात प्रगती केली. झारखंडमध्येही हजेरी लावली. मात्र, अरबी समुद्रात गेल्या आठ दिवसांपासून स्थिती एकसारखीच आहे, त्यात काहीच प्रगती नाही. पुढील 4 ते 5 दिवसात मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या भागात सक्रिय हाोणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news