Khopoli financial fraud : खोपोलीत बँकेच्या सेवानृवित्त कर्मचाऱ्याला 26 लाखांचा गंडा

खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Khopoli financial fraud
खोपोलीत बँकेच्या सेवानृवित्त कर्मचाऱ्याला 26 लाखांचा गंडाpudhari photo
Published on
Updated on

खोपोलीः नाशिक येथे तुमच्या नावाने सीमकार्ड चालू आहे. त्यावरून अश्लील कमेंट केले जात आहेत. तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेमध्ये संबंधीत फसवणुक प्रकरणात तुमची कागदपत्र वापरली जात आहेत अशी भिती दाखवत खोपोलीतील एका सेवानृवित्त कर्मचाऱ्याला बोगस एन.आय.ए. अधिकाऱ्याने 26 लाख 40 हजाराला गंडा घातला. याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बॅक ऑॅफ इंडिया बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मौजे भानुप्रभा सोसायटी,विणा नगर खोपोली येथे राहत आहेत. एन.आय.ए.अधिकारी असल्याचे भासवून व्हॉटसॲपवरुन केलेल्या कॉलवरुन नाशिक येथे तुमच्या नावाने सिमकार्ड चालू आहे त्यावरून अश्लील कमेंट केले जात आहेत. तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेमध्ये संबंधीत फसवणुक प्रकरणात तुमची कागदपत्र वापरली जात आहेत अशी भिती सेवानृवित्त कर्मचाऱ्याला बोगस एन.आय.ए.अधिकाऱ्याने दाखविली.

Khopoli financial fraud
KDMC alliance politics : केडीएमसीत मनसेला गटनेते पद नाही, मनसेला धक्का की, मनसेची खेळी?

तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी 26 लाख 40 हजाराची मागणी करून बॅक ऑॅफ इंडिया व स्टेट ऑॅफ इंडियामधील एफडी रक्कम मोडुन सदरची रक्कम पेन्शन अकाउ्‌ंट नंबरमध्ये वर्ग करण्यास सांगीतले. क्षीरसागर टेक्सटाईल, सोलापुर यांचे नावे असलेल्या आय.सी.आय.सी.आय बॅक या अकाउंट नंबर मध्येच .एन उजमसी ॲन्ड कंपनी आय.सी.आय.सी.आय बॅक अकाउंट पाठवण्यास सांगितले.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने भितीपोटी सदर रक्कम जमा केली.त्यानंतर तुमच्या नावे असलेल्या अरेस्ट वॉरंन्ट कोर्टात पाठविले आहे. तुम्ही सदर केस मधुनमुक्त झाले बाबतची नोटीस तुमच्या व्हॉटसअपवर येईल व आरबीआय बॅकेतून व्हेरीफिकेशनसाठी कॉल येवुन तीन दिवसात तुमची रक्कम तुम्हाला परत केली जाईल असे सांगीतले.

Khopoli financial fraud
Thane murder case : हत्येप्रकरणी बहीण-भावाला जन्मठेप

आरोपीने त्याचा मोबाईल बंद ठेवुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे लक्षात आल्यावर याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन हिरे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news