

खोपोली ः शहरातील मौजे रहाटवडे गावातील सोमजाई माता ही देवी गावाची रक्षणकर्ती असल्याची धारणा आहे.स्वयंभू देवी असून सर्व विघ्न दूर करणारी व नवसाला पावणारी दुखः दायीनी असल्याची अख्यायिका आहे. गावात सुखशांती व समृद्धीसाठी दरवर्षी मंदिरात होमहवन कार्यक्रमाचे आयोजन रहाटवडे ग्रामस्थ मंडळाचे वतीने केले जाते.आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक भक्त नऊ दिवस दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात.
रहाटवडे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसले असून खोपोली शहराला लागून असल्याने अगदी दहा मिनिटाचे अंतरावर आहे.गावातील सण, उत्सव एकोप्याने मोठ्या उत्साहात पूर्वपार पासून साजरे केले जातात. गावातील सोमजाई माता हि देवी गावाची रक्षणकर्ती असल्याची अख्यायिका असून देवी रात्रीच्या वेळी पांढर्या घोङयावर स्वार होत गावाच्या वेशीपासून गावात फिरते असे जुण्या जाणत्या जाणकारांचे म्हणणे आहे.तर देवी पाषाणाची असून स्वयंभू आहे.
देवीचे मंदिर साधे विटकाम कौलारू छप्पराचे होते. 22 - 25 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोदार करण्यात येऊन मंदिराची वास्तू बांधण्यात आली. मंदिरावर कळसाचे रेखीव काम करण्यात आल्याने हे मंदिर आकर्षक दिसत आहे.देवीची दिवा बत्ती, पुजाअर्चा, मानपान पूर्वपार पासून मोहीते पाटील घराण्याकङे आहे. रूढी परंपरे नुसार संतोष विनायक पाटील हे सध्या पहात आहेत. नऊ दिवस देवीचा जागर करण्यात येवून या काळात सकाळी पूजा, रात्रीची दैनंदिन आईची आरती केली जाते. यावेळी तरूण,आबाल,वृद्धासह महिलांचा मोठा सहभाग असतो.
नवमीला मंदिरात होमहवन करून गावात सुखशांती व समृद्धी साठी देवीला साकङे घातले जाते.दरवर्षी नवमीच्या दिवशी भडांर्याचे आयोजन केले जाते.यामध्ये ग्रामस्थांसह तरुणांचा मोठा सहभाग असतो. तर दसरयाला देवीचा पालखी सोहळा संपन्न होतो. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजना मध्ये तरुणाचा पुढाकार असतो. नऊ दिवस दांङीया खेळला जातो नवरात्रौ काळात गावातील वातावरणात भक्तीमय व आनंददायी असते.
रहाटवडे गावाची रक्षणकर्ती सोमजाईमाता मंदिरात नवरात्रौत्सव काळात आईची खणा नारळाने ओटी भरली जाते. दर्शनाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक भक्त दर्शना साठी नऊ दिवस येत असतात. दसर्याच्या दिवशी रानातून आपट्याच्या झाडाच्या (फांदया )पाणे आणून मंदिरात त्याचे पुजन करून पूर्वपारपासून रूढी, पंरपरे नुसार ग्रामस्थ सोने लुटतात नंतर गावात घरोघरी जावून सोने वाटप करून एकमेकांना सुभेच्छा दिल्या जातात.