

खोपोली ः खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार भाजपने केला आहे.यामुळे महायुतीतील मित्रपक्षांचे धाबे दणालले आहे.नगराध्यक्षपदासाठी आता यशवंत साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.
खोपोली शहरात महायुतीमधील भाजप,अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचा मोठी ताकद असल्यामुळे तिन्ही पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.राष्ट्रवादी असो की शिंदे गट नगराध्यक्षपद भाजपला देईल त्यांच्यासोबत एकत्रित निवडूक लढू असा संकेत भाजपचे नेते यशवंतशेठ साबळे यांनी दिले होते.मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
इच्छुकांच्या नावांची जोरदार चर्चा
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर माजी डॉ नगराध्यक्ष सुनील तर माजी सभापती मंगेश दळवी या तीन जनांची नावे चर्चेत आहेत. यातील कोणाच्या नावाची घोषणा अद्याप नाही.तर शिवसेना शिंदे गटाकडून एकमेव कुलदीपक शेंडे इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी घोषित झाल्याने भाजपा ला विश्वासात न घेता घोषणा केल्याने भाजपाने वरिष्ठ पातळीवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची तयारी केली आहे तर शिवसेनेच्या घोषणे बाबत विचारणा केली असता जो पर्यत वरिष्ठ पातळीवर पत्रकार परिषदेतून घोषणा होत नाही तो पर्यत अधिकृत उमेदवारी घोषणा नसल्याचे शिंदे गटाकडून उत्तर मिळाले असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू यशवंत साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे महायुती मध्ये खळबळ उडाली आहे.