

खोपोली (रायगड) : खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरातीला राजकीय वातावरण ऐन कडाक्याच्या थंडीत चांगलेच तापले आहे. राज्यात महायुतीचेच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपने खोपोलीतील शिंदे शिवसेनेवर कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे. त्या पक्षातील मातब्बरांना आपल्या पक्षात घेत थेट उमेदवारीच जाहीर केली जात असल्याने शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
खोपोली शहरात भाजपाने शिवसेना शिंदे शिवसेनेला धक्का देत नगरसेविका उमेदवारीच्या प्रभावी दावेदार असणाऱ्या सोनिया रूपवते व मुकेश रूपवते यांचा भाजप पक्षात जाहीर पक्ष प्रवेश घेऊन आमदार थोरवे यांना मोठा धक्का दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादीनंतर भाजपही शिंदे गटातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू केल्याने मतदारांमध्ये शिवसेनेचा आमदार असताना कार्यकर्ते सोडून जात असल्याने त्याचा नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांना मोठा फरक पडेल अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती तील घटक पक्ष असणाऱ्या शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे खोपोली शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिलगुल वाजताच महायुतीमध्ये राष्ट्रवादी व शिंदेची शिवसेनेचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. परस्परांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यात आता भाजपनेही जोरदार मुसंडी मारत शिंदे गटाची गोची केली आहे.
निवडणुकीत खोपोलीमध्ये भाजपा व शिंदे शिवसेना युती जरी झाली असली तरी भाजपने किंगमेकरच्या भूमिकेत राहून अनेक कार्यकर्ते फोडण्याच काम शिवसेनेच्या न कळत सुरू केले आहे. आमदार थोरवे चे कट्टर समर्थक असणारे नगरसेवका उमेदवारीच्या दावेदार सोनिया रुपवते व मुकेश रूपवते यांना फोडण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. त्यांचा नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थिती मध्ये भाजप प्रवेश करून घेतला व उमेदवारी ही दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे काम लोकउपयोगी आहे . मुख्यमंत्री फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच खोपोली शहरात चांगली कामे होत आहेत. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचेही काम चांगले आहे. आम्ही पाच ते सहा महिन्यांपासून खोपोलीचे नेते यशवंत साबळे व अन्य कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो आज भाजप पक्षात आल्यानंतर आनंदी आहोत.
मुकेश रुपवते, भाजप कार्यकर्ते खोपोली
शिंदे गट संपविण्याचा प्रयत्न
या पक्ष प्रवेशामुळे आमदार थोरवे यांना मोठा धक्का समजला जात असून भाजपा युती करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेऊन शिवसेना शिंदे गट संपवण्याच्या काम करत असल्याची चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू आहेय सोनिया रूपवते यांच्याकडे शहर संघटिका पद होते. त्यांचा मागील आठवड्यात वाढदिवस साजरा झाला यावेळी खुद्द आमदार थोरवे व प्रमुख कार्यकर्ते रुपवते व्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मोठी चर्चा झाली मात्र तेच कार्यकर्ते शिवसेना सोडून जात असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना धक्का देणारा असल्याचे बोलले जात आहे. एकापाठोपाठ कधी राष्ट्रवादी तर आता भाजपही धक्के देत असल्याने आमदार थोरवे यांना मोठा धक्का मानला जात आहे.