Khopoli Agriculture Update
खोपोली : गेले काही दिवस पावसाचे आगमन मोठ्या प्रमाणात होत आहे. आता मात्र मृग नक्षत्र सुरु झाल्यांने शेतकरी वर्गांने आपल्या जवळ असलेली बैल जोडी घेऊन शेतीच्या कामाकडे वळलले असल्यांचे दृश्य तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयांस मिळत आहे. यामुळे पेरणी करण्यांस करण्यांस प्रारंभ होत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.
पावसामुळे शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात अग्रेसर असलेले लाकडी नांगर घेवून शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. खांद्यावर चाबूक, खिल्लारी सर्जा - राजांची डौलदार बैलजोडी, अन औतावरील मधूर गीतांच्या आरोळीने रानोमाळ गर्जू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. यामुळे खरीप पिकांच्या पूर्व मशागतीच्या कामांची धांदल उडाली आहे.
सकाळ सायंकाळ हा परिसर बळीराजाच्या औताच्या गीतांच्या मैफिलीने रंगून जात आहे. रानपाखरांच्या गाणारे स्वर अन बळीराजाची शाहीर गीते, सर्जा - राजाच्या गळ्यातील घुंगारांचा आवाज या मंजूळ स्वरांनी रानोमाळ संगीतमय झाला असून शेतीची कामे करण्यास बळीराजा मग्न झाला आहे.
औतावरील गीतांच्या मधूर मैफलीमध्ये सर्जा 'राज्याच्या नावानं गीत गाणे, ओव्या गाणे, बैलांना हाक देणे आसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे यामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय हे निश्चित. रविवारपासून मृगाच्या पावसाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या पावसातच भात रोपांची लागवड अपेक्षित आहे.