European Roller Bird: मध्य आशिया ते आफ्रिका प्रवास करणाऱ्या ‘युरोपियन रोलर’चे खारघरमध्ये दर्शन

भारतातून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान करतो स्थलांतर; पक्षी अभ्यासकांचे लक्ष वेधले पनवेल परिसरात
European Roller Bird
European Roller BirdPudhari
Published on: 
Updated on: 

राजेश डांगळे

खांदा कॉलनी: खारघर सेक्टर-१ परिसरात नुकतेच ‘युरोपियन रोलर’ या आकर्षक स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले आहे. पक्षी अभ्यासक माधव आठवले यांच्या निरीक्षणात हा पक्षी आढळून आला असून, त्याचे छायाचित्रही टिपण्यात आले आहे. निळसर-हिरवट छटा असलेले शरीर, तपकिरी पंख आणि काळसर चोच यामुळे हा पक्षी सहज लक्ष वेधून घेतो.

युरोपियन रोलरचे शास्त्रीय नाव Coracias garrulus असून तो रोलर कुटुंबातील पक्षी आहे. भारतात हा प्रामुख्याने ‘पॅसेज मायग्रंट’, म्हणजे स्थलांतराच्या मार्गावरून जाणारा पक्षी म्हणून नोंदला जातो. विशेषतः पश्चिम आणि वायव्य भारतातून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान त्याचे स्थलांतर दिसून येते.

European Roller Bird
Diwali Special Trains: पूजा, दिवाळीसह छठ उत्सवासाठी ४१८ विशेष गाड्या

महाराष्ट्रातही या पक्ष्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. युरोपियन रोलरचा प्रजनन प्रदेश युरोपपासून मध्य आशियापर्यंत पसरलेला आहे. भारतातील काही भागातून तो स्थलांतराच्या काळात पुढे आफ्रिकेकडे जातो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात खारघरमध्ये त्याचे दर्शन होणे पक्षीनिरीक्षकांसाठी विशेष नोंद ठरते, असे निरीक्षण पक्षी अभ्यासाच्या माहितीतून करता येते.

महाराष्ट्रासाठीच्या State of India's Birds नोंदीनुसार युरोपियन रोलर हा Passage Migrant आणि Localized Summer Migrant म्हणून नोंदला आहे. त्याची जागतिक संवर्धन स्थिती Least Concern आहे, तर भारतात त्याचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-२ मध्ये करण्यात आला आहे.

European Roller Bird
Kharsai Dam: एक योजना ३ वर्षे, धरण ४० वर्षे रखडले! म्हसळ्यातील पाणीप्रश्नावर मोठे प्रश्नचिन्ह

खारघरमधील वाढत्या नागरीकरणाच्या परिसरातही विविध स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होत असल्याने येथील मोकळी मैदाने, झाडे आणि हिरवाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पक्षीनिरीक्षकांनी अशा पक्ष्यांचे निरीक्षण करताना त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पक्षी अभ्यासक माधव आठवले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news