Khalapur Zilla Parishad Election: खालापूरमध्ये समतोल कौल; जि.प.च्या चारही जागांवर चार पक्ष विजयी, पं.स.वर भाजप–शिंदे गटाचे वर्चस्व

पंचायत समितीत महायुतीला स्पष्ट बहुमत; उबाठाचा मर्यादित कमबॅक
Khalapur Zilla Parishad Election
Khalapur Zilla Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

खालापूर : अंकुश मोरे

खालापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या चार जागांवर चार पक्षांना यश मिळाले.तर पंचायत समितीमध्ये आठ जागांमध्ये भाजपने 4 जागा जिकून मोठे यश मिळवले.

खालापूर तालुक्यात अजित पवारांची राष्ट्रवादी,उध्दव ठाकरे पक्षाची परिवर्तन विकास आघाडी आणि भाजप,शिवसेना महायुतीत यांच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सामना रंगला आहे.जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी,भाजप,शिंदे गट आणि उबाठाचे उमेदवार विजयी करून मतदारांनी समतोल राखला आहे.तर खालापूर पंचायत समितीमध्ये भाजपचे तीन,शिंदे शिवसेनेचे दोन,अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन तर उध्दव ठाकरे शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणून आले आहे.त्यामुळे पंचायत समितीवर महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाला आहे.

Pudhari
Khalapur Zilla Parishad Election
Karjat Zilla Parishad Election: कर्जत:महायुतीचा सुपडा साफ, परिवर्तनची जोरदार मुसंडी

आत्करगांव जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या सुनबाई आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या पत्नी श्रध्दा साखरे यांच्यात निवडूक झाली यामध्ये रेश्मा पाटील यांचा विजय झाला.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या विजय झाला आहे त्यांनी शिंदे गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा दारून पराभव केला आहे.

भाजप आणि शिंदेची शिवसेनेचे महायुती तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंची शिवसेना, शेकापक्षाने परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित असल्याने खालापूर तालुक्यातील चारही जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रंगतदार असल्याने सर्वांचे लक्ष लागले होते.

Khalapur Zilla Parishad Election
Mhasla Zilla Parishad Election: म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीचा धडाकेबाज गजर; जि.प. व पं.स.च्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व

वासंबे जि.प.गट नेहा भूषण पारंगे (भाजप) 10161 मते विजयी,संदीप सुदाम मुंढे (अजित पवार गट राष्ट्रवादी) 8818 मते पराभूत,

चौक जि.प.गट -वैशाली विष्णू खैर, (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 11545 मते विजयीतरसंगीता विजय निरगुडा,(भाजप)8845 मते पराभूत,सावरोली जि.प.गट संतोष गणेश बैलमारे (अजित पवारांची राष्ट्रवादी) 11776 मते विजयी,ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड,(शिंदे गट शिवसेना) 10400 मते पराभूत,आत्करगांव जि.प.गट रेश्मा राजेश पाटील (शिवसेना शिंदे) 11261 मते विजयी,श्रद्धा अंकित साखरे,(अजित पवार गट राष्ट्रवादी) 10199 मते पराभूत

चांभार्ली पंचायत समिती गण- अर्चना भोईर (भाजप )4967 मते विजयी,रोशन बाळाराम राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 3781 मते पराभूत, रीस पं. स. गण - कृष्णा पारंगे,(भाजप) 5391 मते विजयी,निखिल ढवळे, (काँग्रेस) 4693 मते पराभूत,

Khalapur Zilla Parishad Election
Tala Zilla Parishad election: तळा तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा कायम; जि.प. व पं.स.च्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व

चौक पं. स. गण- कमळ भस्मा, (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 5208 मते विजयी,अरुणा रमेश पारधी, (भाजप) 4604 मते पराभूत,हाळ पंचायत समिती गण-रितेश जाधव (शिंदे शिवसेना) 5327 मते विजयी,लक्ष्मण सुदाम वाघमारे,(अजित पवार राष्ट्रवादी) 4905 पराभूत,वाशिवली पंचायत समिती गण -गौरी गडगे,(भाजप) 6397 मते विजयी, पूमन विलास म्हात्रे,(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4917 मते पराभूत,सावरोली पंचायत समिती गण प्रमिला पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 11261 मते विजयी,माधुरी संदेश पाटील (भाजप) 10199 मते पराभुत,खानाव पं. स. गण भाई रघुनाथ शिंदे, शिंदे शिवसेना 6018 मते विजयी,भूषण सूर्यकांत पाटील,(अजित पवार गट राष्ट्रवादी) 4999 पराभूत,आत्करगांव देवयानी देशमुख (अजित पवार गट राष्ट्रवादी) 7089 मते विजयी,रोहिणी गणेश येरम (शिंदे गट शिवसेना) 3284 पराभूत झाले आहे.

Khalapur Zilla Parishad Election
Mangaon Zilla Parishad Election: माणगाव पंचायत समितीवर पुन्हा भगवा; जिल्हा परिषदेत शिवसेना–राष्ट्रवादीत बरोबरी

जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर राष्ट्रवादी,भाजप,शिंदे गट आणि उबाठाचे उमेदवार विजयी झाले आहेत.तर खालापूर पंचायत समितीच्या आठ पैकी पाच जागा भाजप शिंदे गटाने जिंकल्याने एकहाती सत्ता बसणार आहे.तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक जिल्हा परिषद जागा आणि दोन पंचायत समितीवर उमेदवार निवडून आणत कमबॅक केलं आहे, तर भाजपचे नेते नरेश पाटील यांच्या सुनबाईने शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली असल्याने शिंदेच्या शिवसेनेला भोपळा फोडता आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news