Mhasla Zilla Parishad Election: म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीचा धडाकेबाज गजर; जि.प. व पं.स.च्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व

घड्याळाचा दणदणीत आवाज; विरोधकांना मोठ्या मताधिक्याने पराभव
Mhasla Zilla Parishad Election
Mhasla Zilla Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

जिल्हा परिषद व पं. स.च्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत घड्याळाचा दणदणीत गजर केला आहे. जि.प.च्या दोन आणि पं.स.च्या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.

Pudhari
Mhasla Zilla Parishad Election
Tala Zilla Parishad election: तळा तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा कायम; जि.प. व पं.स.च्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व

पाभरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल रामचंद्र बसवत यांनी एकूण 5,993 मते मिळवत शेकापचे संतोष पाटील (2,884 मते) व शिवसेना शिंदे गटाचे अकमल कादरी (2,648 मते) यांचा पराभव केला. अनिल बसवत यांनी तब्बल 3,109 मताधिक्याने विजय मिळवला.

पांगलोळी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक भास्कर विचारे यांनी 6,322 मते घेत शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद बोर्ले (2,567 मते) व उबाठाचे रोशन पारावे (1,448 मते) यांना मागे टाकत 3,755 मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला.

Mhasla Zilla Parishad Election
Mangaon Zilla Parishad Election: माणगाव पंचायत समितीवर पुन्हा भगवा; जिल्हा परिषदेत शिवसेना–राष्ट्रवादीत बरोबरी

पं.स.निवडणुकांमध्येही राष्ट्र. काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली

पाभरे पं.स. गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समृध्दी संदीप चाचले यांनी 3,078 मते मिळवत शेकापच्या ज्योती गीजे (1,443) व शिवसेना शिंदे गटाच्या अमिता जाधव (1,258) यांचा पराभव करत 1,635 मताधिक्याने विजय मिळवला.तसेचखरसई पं.स.गणातून रा.काँ.चे लहू अंबाजी म्हात्रे यांनी 2,778 मते घेत शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील (1,668) व उबाठाचे रमेश खोत (1,220) यांचा पराभव करत 1,110 मताधिक्याने विजय मिळवला.

Mhasla Zilla Parishad Election
SKP Raigad Politics: रायगडमध्ये शेकापचा अस्ताचा इशारा; सत्तेच्या मक्तेदारीतून वैचारिक पराभवाकडे वाटचाल

साळविंडे पं.स. गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन श्रीपत मनवे यांनी 3,413 मते मिळवत शिवसेना शिंदे गटाचे अमोल पेंढारी (1,592) व उबाठाचे बाळकृष्ण म्हात्रे (707) यांचा पराभव करत 1,821 मताधिक्याने विजय संपादन केला.पांगलोळी पं.स. गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका प्रसन्न निंबरे यांनी 3,131 मते मिळवत शिवसेना शिंदे गटाच्या रिया पाटेकर (949) व उबाठाचे चैतन्या गजमल (731) यांचा पराभव करत 2,182 मताधिक्याने विजय मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news