

प्रशांत गोपाळे
खोपोली: खालापूर तालुक्यातील निगडोली गावात घरात 72 वर्षीय वृध्द दाम्पत्याची गळा कापून निर्घूण हत्या केल्याची घटना मंगळवारी 26 मे रोजी घडली आहे.वयोवृद्ध दाम्पत्यांची हत्या झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच संपूर्ण खालापूर तालुका हादरला आहे.
नातेवाईकांच्या आक्रोशाने हळहळ व्यक्त होत आहे. या खुनाची उखळ व्हावी यासाठी घटनास्थळी खालापूर पोलिस ,फॉरेन्सि लॅब टीम डॉग स्कॉड अन्य तपास यंत्रणा दाखल होऊन या घटनेचा जळतगतीने तपास सुरू झाला.
रात्री उशिरा रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी ही भेट दिली मात्र हल्लेखोर शाफिरच पोलिसांनी तापसाची दिशा सापडेना त्यामुळे या गुन्ह्याची उखळ करण्यास पोलीसांसमोर मोठे अहवान बनले आहे . बँकेतून सेवानिवृत्त झालेले मयत रघुनाथ दत्तू फराट ( वय 72 ) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फटाट ( वय -68 ) हे दोघेच निगडोली राहत होते.
त्यांची मुले खोपोली व खालापूर मध्ये वास्तव्यात आहेत गावातील घरात दोघेजण साधे जीवन जगत असताना मंगळवारी 26 मे रोजी रघुनाथ फराट यांच्या मुलाने वडिलांचा मोबाईल दिवसभर लागत नसल्याने बंद का आहे त्यांचा फोन लागत का नाही मनात शंका आल्याने भितीपोटी त्यांनी नातू आदित्य फराट याला गावातील घरी पाठविला आदित्यने घराचा दरवाजा वाजविला असतानाही ते उघडत नसल्यामुळे आदित्याने मागच्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला यावेळी आजी आजोबा रक्ताच्या थरोळ्यात पडले होते.
रघुनाथ दत्तू फराट यांचा गळा कापला होता तर त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फटाट यांच्या तोंडावर वार केले आणि अंगावर राख आणि पाळापाचोळा टाकलेला दिसून दिसून आल्यावर आराडा ओरडा केला यावेळी गावातील गावकरी जमा झाले.
घटनास्थळी खालापूर पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नेहुल पाटील पोलीस निरीक्षक सचिन पवार तात्काळ पोहचून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सी लॅबची टीम घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे.त्यांनतर या घटनेची माहिती रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधिकारी विजय शिवतारे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीस अधिकारी वर्गाला सूचना करून लवकरच या गुन्ह्यांची उखळ होईल असा विश्वास ही व्यक्त केला मात्र 72 तास उलटून ही पोलिसांना तपासाची दिशा सापडत नाही.
72 तास झाले तरी पोलिसांना तपासाची दिशा सापडेना त्यामुळे आता या खुनाची उखळ करणे म्हणजे खालापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. या हत्यांचे कारण मात्र समजू शकले नाही मात्र पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पाहणी करून सतर्क झाली आणि तपासाचे वेग ही वाढविली संशयित काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी ही केली तरी मात्र अद्याप या खुनाचा उलगडा होऊ शकला नाही त्यामुळे हल्लेखोरांनी राख आणि पालापाचोळा मयताच्या अंगावर टाकून काही या घटनेचा उलगडा होऊ नये यासाठी काही शकल तर लढविली नाही ना अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.