Karjat River Accident:कुटुंबासमोर काळ बनून आले पाणी;कर्जतच्या पेज नदीत दोन जिवलग विवाहीत मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
Karjat River Accident
Karjat River AccidentPudhari
Published on
Updated on

नेरळ: कर्जत तालुक्यातील आंजप गाव परिसरातील पेज नदीत बुडून दोन विवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्दैवी घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अजय भास्कर म्हसे (वय 33, रा. वारे, ता. कर्जत) आणि सुनील महेंद्र प्रजापती (वय 35, रा. चाफेकर नगर, शिवाजीनगर, पुणे) अशी दोघां मृतांची नावे आहेत.

Karjat River Accident
Mhapral Weekly Market: वाकडचा माणूस अजूनही म्हाप्रळच्या बाजारातच रमतो! मॉलच्या जमान्यातही म्हाप्रळचा आठवडा बाजार सुपरहिट

मृत्यूमुखी पडलेले दोघेही जिवलग मित्र असून, आपल्या पत्नी व मुलांसोबत सहकुटूंब सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, या आनंदाच्या क्षणावर अचानक काळाने घाला घातला.

Karjat River Accident
Kharif Seed Shortage: शेतकरी राजा बियाण्यांच्या प्रतीक्षेत; यंदाच्या खरीपासाठी अनुदानित स्वरूपात 16 हजार 950 टन बियाण्यांचे वितरण

पाणी सोडण्यापूर्वी ना धोक्याची सूचना ना सायरन अलर्ट

टाटा पॉवर हाऊसकडून सकाळी आणि संध्याकाळी पेज नदिता पाणी सोडण्यात येते. मात्र पाणी सोडताना कोणत्याही प्रकारची सूचना वा अलर्ट सायरन वाजवण्यात येत नाही. स्थानिकांना पाणी सोडण्यात येते या बाबत माहिती आहे, मात्र बाहेरुन आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसल्याने नदित अचानक पाणी वाढल्याने त्याचा अंदाज आला नाही आणि दोघांचा बुडून मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news