Kashid Jetty Project: काशीद जेट्टीचे काम रखडले; ११२ कोटींची मंजुरी होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण

मुरुड तालुक्यातील काशीद येथे अत्याधुनिक जेट्टी उभारण्यासाठी २०१९ मध्ये ११२.४६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुंबई-काशीद थेट जलमार्ग जोडण्याचा उद्देश असलेला हा प्रकल्प अद्याप रखडलेला आहे.
Kashid Jetty Project
Kashid Jetty ProjectPudhari
Published on
Updated on

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून २३ जानेवारी २०१९ रोजी शासकीय आदेश काढून या कामासाठी ११२.४६ कोटी रुपये मंजूर करून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

मात्र अद्याप जेट्टीचे काम रखडलेले आहे. मुरुड तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही जेट्टी महत्वाची आहे.

Kashid Jetty Project
BMC Plastic Fine: प्रतिबंधित प्लास्टिकवर मनपाची कारवाई; ९.४० कोटींचा दंड वसूल, १२२ टन प्लास्टिक जप्त

मुरुड तालुक्यातील काशीद हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडते ठिकाण असून येथे दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांची सुविधा सध्या मांडवा येथून करण्यात येत आहे.

मांडवा ते काशीद हे प्रवास अंतर तीन तासांचे आहे. हे अंतर वाचवण्यासाठी पर्यटकांना थेट सुविधा मिळावी यासाठी काशीद ते मुंबई हे थेट अंतर जलमार्गाने जोडण्यासाठी सदरील जेट्टीला मंजुरी देण्यात आली.

Kashid Jetty Project
Kolad Pune Road Accident: कोलाड-पुणे मार्गावर कंटेनर २५० फूट खोल दरीत कोसळला; दोघे जखमी, ५ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर चालकाची सुटका

मुंबई ते काशीद जलमार्गाने किमान दोन तासात गाठता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे जलद गतीने पोहचता येणार आहे. ब्रेकवॉटर वॉल काम पूर्ण होऊन वर्ष झाले. नूतन जेट्टीचा ४१ कोटींचा प्रस्ताव मंजुरीला गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news