

पोलादपूर शहर : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा कंटेनर पलटी झाल्याने एक मार्गिका पूर्ण बंद झाली होती. सुदैवाने जीवित हानी टळली. हा अपघात बुधवारी सकाळी घडला होता. संध्याकाळानंतर ही मार्गिका सुरु करण्यात आली.
कंटेनर चालक राम आचल मिंद (रा.उत्तरप्रदेश) हा कंटेनर घेऊन लोटे ते भिवंडी वाडा असा निघाला होता. कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई गावच्या आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर पलटी झाल्याने कंटेनर मधील पेप्सीच्या बॉटल सर्वत्र अस्ताव्यस्त महामार्गावर पसरून व कंटेनर पूर्ण रस्त्यावर आडवा झाल्याने एक मार्गिका पूर्णपणे बंद झाली होती.
या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना समजतात पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली तसेच कशेडी महामार्ग पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक पोलादपूर खेड दिशेने जाणाऱ्या एकाच मार्गावरुन वळवून सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. सदर अपघात ग्रस्त कंटेनर मधील महामार्गावर अस्ताव्यस्त पडलेल्या पेप्सी बॉटल बाजूला करण्याचे व क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू होते.संध्याकाळनंतर हा अडथळ दूर करण्यात आला.त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
दरम्यान,सध्या या परिसरात महामार्गावरुन वाहनेही भरधाव वेगाने नेली जात असल्याबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.अनेकठिकाणी वळणावर वाहनांवरील नियंत्रण सुटून अशा दुर्घटना घडतात.