CSMT Khopoli Local Attack : लोकलमधील चाकूहल्ल्याचा अवघ्या १२ तासांत छडा

कर्जत जीआरपीकडून दोन आरोपी जेरबंद; एक आरोपी फरार; पोलिसांची जलद कारवाई
CSMT Khopoli Local Attack
लोकलमधील चाकूहल्ल्याचा अवघ्या १२ तासांत छडाpudhari photo
Published on
Updated on

नेरळ : आनंद सकपाळ

सीएसएमटी-खोपोली लोकलमधील एका प्रवाशावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कुमार बोलामनी पाठक वय वर्ष २६, रा. मस्जिद बंदर, मुंबई हे गुरुवारी दि. ११ जून सकाळी सुमारे ६.३० वाजता भायखळा रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी-खोपोली लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. लोकल वांगणी स्थानक ओलांडल्यानंतर सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला.

CSMT Khopoli Local Attack
Dombivli Massage Parlour Raid : डोंबिवलीमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलची मोठी कारवाई

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले, व आरोपींनी फिर्यादीच्या पोटात चाकूने वार करून गंभीर दुखापत केली तसेच मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२), ३५२ व ३( ५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटने प्रसंगी तक्रार दाखल होताच कर्जत रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड व गुन्हे शोध पथकाने उल्हासनगर, शेलू, नेरळ रेल्वे स्थानके तसेच नेरळ शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, व तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत नेरळमधील ममदापूर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इब्रान इद्रिस अन्सारी वय वर्ष १८, रा. नेरळ आणि करण कन्हैयालाल अग्रवाल वय वर्ष २२, रा. शेलू अशी असून, चौकशीनंतर त्यांना रात्री ९.२५ वाजता अटक करण्यात आली आहे.

CSMT Khopoli Local Attack
Chandrapur Crime | वरोरा तालुक्यात रेती व्यावसायिकाचा खून: तलवारीने सपासप वार करून नदीत फेकले; डिझेल टाकून वाहने जाळण्याचा प्रयत्न

दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी सिद्धार्थ गायकवाड रा. नेरळ हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक करण्यात कर्जत रेल्वे पोलिसांना यश आल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत या कारवाईत पीएसआय भाऊसाहेब कुरुंद, गुन्हे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड, पोलीस हवालदार प्रवीण कांबळे, हमीद शेख, सचिन चव्हाण तसेच पोलीस अंमलदार नितीन मोहिते, चोरमले, श्रीकांत जाधव, प्रवीण मुलमुले आणि अक्षय पेरणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना

या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश एम. कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील तसेच कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news