Neral Crime News: गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारा जेरबंद; गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त

कोंढवा येथून घेतले ताब्यात
Neral Crime News
Neral Crime Newspudhari
Published on
Updated on

नेरळ: पिस्तूलातून गोळीबार करून एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे दहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला कर्जत पोलिसांनी अखेर अटक केली आहे. जतीन पवार (वय २४, रा. जांभूळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला १९ ऑगस्ट रोजी कोंढवा, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरल्याचे सांगण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री पोटलवाडी, पोस्ट गौळवाडी, ता. कर्जत येथे फिर्यादी इस्माईल सैय्यद मालदार (वय ६५) हे आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत मुफीज गुलाम मालदार याच्यासोबत जागेच्या वादाच्या अनुषंगाने चर्चा करीत होते.

यावेळी मुफीज मालदार याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींपैकी जतीन संतोष पवार याने त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल फिर्यादीच्या दिशेने रोखून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने एक राऊंड फायर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

Neral Crime News
Contractors Dues: राज्यभरातील कंत्राटदार रस्त्यावर उतरणार; ८६ हजार कोटींच्या थकबाकीसाठी कंत्राटदार आक्रमक

घटनेनंतर कर्जत पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला. या गुन्ह्यात यापूर्वी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, फिर्यादीच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार करणारा मुख्य आरोपी जतीन पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

Neral Crime News
Maharashtra Libraries: तुटपुंज्या अनुदानातून खर्च भागविताना ग्रंथालयांच्या नाकीनऊ

आरोपी हा सराईत स्वरूपाचा असल्याने तो वारंवार आपला ठावठिकाणा आणि लपण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत होते. कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय ठेवून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. अखेर एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार, आरोपी कोंढवा-पुणे येथे एका मित्राच्या राहत्या घरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कारवाई करीत १९ ऑगस्ट २०२६ रोजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news