Karjat Panchayat Samiti election : कर्जत पं.स.वर परिवर्तन आघाडीचे वर्चस्व

सभापतीपदी नमिता घारे, उपसभापतीपदी चित्रा ठाकरे यांची निवड,मान्यवरांकडून अभिनंदन
Karjat Panchayat Samiti election
कर्जत पं.स.वर परिवर्तन आघाडीचे वर्चस्व pudhari photo
Published on
Updated on

नेरळ : कर्जत पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी पार पडली आहे. पं.स.वर परिवर्तन आघाडीचे वर्चस्व मिळविले असून, सभापती पदी नमिता घारे, उपसभापतीपदी चित्रा ठाकरे यांची निवड करण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धनंजय जाधव यांनी काम पाहीले तर या कामी त्यांना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार पडलेल्या झालेल्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद गटाच्या सहा जागांपैकी सहा तर पंचायत समिती गणाच्या 12 जागांपैकी 10 जागांवर निवडूण येत पंचायत समिती गणाच्या निवडणूकीत बहुमत मिळवले होते.

Karjat Panchayat Samiti election
Panvel Panchayat Samiti BJP win :पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ

त्यानुसार सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आपला अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करून, परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापती पदी तर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापती बिनविरोध निवडण ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार धनंजय जाधव यांच्याकडून घोषीत करण्यात आले आहे.

दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. त्यांच्याउपस्थितीत पदग्रहण करण्यात आले आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच सर्व सदस्यांचे कर्जत बीडीओ सुशांत पाटील व अधिकारी व कर्मचारीवर्गाकडून सत्कार करण्यात आला.

Karjat Panchayat Samiti election
Street vendors protest : फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा!

या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष त्सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष दिपक श्रीखंडे, अशोक भोपतराव, बंधू पाटील, भगवान भोईर, सुनिल पाटील, रंजना धुळे, नगराध्यक्षा पुष्पा दगडे, शिवसेना उबाठा पक्षाचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, रशिका नितिन सावंत आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जतच्या जनतेने मोठ्या विश्वासाने परिवर्तन घडविले आहे.सभापती आणि उपसभापती म्हणून आम्ही एकत्रपणे विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू,सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.

नमिता घारे, नूतन सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news