

नेरळ : सततच्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निसर्गरम्य पाली-भुतवली धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले असून, धरणाच्या सांडव्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
धरणाच्या सांडव्यावरून फेसाळत वाहणारे पाणी, सभोव तालच्या हिख्यागार डोंगररांगा आणि पावसाळी वातावरण यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असून निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, वाढत्या गर्दीमुळे सुरक्षि-ततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने पर्यटकांना धरणाच्या सांडव्यावर जाणे, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ उभे राहणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे तसेच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या काही पर्यटकांकडून अशीही चर्चा होत आहे की, काही स्थानिक तरु-णांकडून "येथे पोलीसांकडून प्रवेशबंदी असून कारवाई होईल," अशी भीती दाखवत पर्यटकांना दमदाटी करून पैशांची बेकायदेशीर मागणी केली जात आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
याबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे कोणीही व्यक्ती पर्यटकांना धमकावून किंवा खोटी कारणे सांगून पैशांची मागणी करत असल्यास, त्यांनी तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. अशा प्रकारांना कोणत्या ही प्रकारे पाठीशी घातले जाणार नसून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अफवा, बेकायदेशीर मागण्यांना बळी पडू नका
पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध धबधबे, नद्या आणि धरणे पर्यटकांना आकर्षित करत असताना, पाली-भुतवली धरण हेही निस-र्गप्रेमींसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. मात्र, निसर्गाचा आनंद घेताना सुर-क्षिततेचे भान राखणे आणि कोणत्याही अफवा किंवा बेकायदेशीर मागण्यांना बळी न पडता थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.