

नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ वाल्मिकी नगर येथील असलेल्या ब्रिटीश कालीन पुलाचा मधला ठेव्याचा ओढ्यातील पाण्याच्या होणाऱ्या माऱ्यामुळे दगडी धासल्याने वाहतूकीसाठी हा पूल धोकादायक म्हणून पोलीस व संबंधीत विभागाचे अधिकारी तसेच नागरिकांच्या सर्तकपणामुळे हा जिर्ण पुल हा तात्काळ बंद करण्यात आला होता. तर सदर रस्ता रूंदीकरण कामा दरम्यान शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या नवीन पुल हा वाहतुकी खुला करण्यात आला होता. मात्र नविनअरूंद पुलामुळे वाहतुक कोंडीच्या समस्याला वाहनचालकांना सामोरे जाण्याची वेळ ही या नविन पुलाचे बांधकामाची प्रगती पहाता लवकरच दूर होणार आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ही6तील कर्जत - कल्याण असलेल्या मुख्य राज्यमार्ग असलेल्या रस्त्यावरील नेरळ पोलीस ठाणे व वाल्मिकी नगर येथे ब्रिटीश कालीन असे दोन जुने पुल असुन, या दोन्ही पुलाचे बांधकाम हे नेरळ मधील राहाणार जुने ठेकेदार हनिप करीम सय्यद यांनी बांधकाम केले होते.
या पुलांच्या दोन्ही कामाला साधारण 45 ते 50 वर्ष झाली असुन, या पुलांच्या ठेव्यांचे काम हे दगडीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले होते. तर पावसाळ्यामध्ये माथेरानच्या डोंगर रांगातून प्रचंड प्रमाणात वाहाणारा पाण्याचा लोंढ्यामुळे या जिर्ण पुलाच्या मधल्या दगडी बांधकामाच्या ठेव्याच्या दगडी या रविवार 29 जून 2025 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान पाण्याच्या लोंढयामुळे निखलून पडल्याने सदर पूलाची खचण्याचे स्थिती निमार्ण झाली होती.
सदर बाब ही नागरिकांच्या लक्षात आल्याने, व ही माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना मिळताच त्यांनी जागेवरी परस्थितीची पाहणी करून सदर पूल हा तात्काळ वाहतूकीसाठी बंद करून शेजारी बांधण्यात आलेला नवीन पूलावरील पार्किंग केलेल्या बंद गाडया तात्काळ हाटवून, सदर नवीन पूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. तर शेजारी बांधण्यात आलेला मात्र बंद स्थितीत असलेला नवीन पूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
मात्र पावसाळा संपूनही अनेक महिने उलटले तरी या पुलाच्या कामाला सुरू झाली नसल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने, याचा फटका हा स्थानिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
लवकरच पूल वाहतुकीसाठी होणार खुला
जिर्ण ब्रिटीश पुलाच्या ठिकाणी नव्याने सुरू असल्याचे ठेव्याचे काम हे पूर्ण होऊन या ठेव्यांवर दोन आर सी सी स्लॅबचे काम पूर्ण होऊन शेवटचा स्लॅबचे कामाला सुरवात होऊन या पूलाचे काम हे प्रगतीपथावर असल्याचे दिसुन येत असल्याने, हा पूलाचे काम हे लवकरात लवकर पूर्ण होऊन सदर पूल हा वाहतुकीसाठी खुला होण्याच्या मार्गावर असल्याने, या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. या पुलाच्या कामाची प्रगती पहाता वाहनचालमांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.