

नेरळ (रायगड) : आनंद सकपाळ
कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ वाल्मिकी नगर येथील असलेल्या ब्रिटीश कालीन पुलाचा मधला ठेव्याचा ओढ्यातील पाण्याच्या होणार्या मार्यामुळे दगडी धासले असल्याने वाहतूकीसाठी हा पूल धोकादायक असल्यामुळे हा जुना पुल वाहातुकीसाठी अधिकारी व नागरिकांच्या सर्तकपणामुळे तत्काळ बंद करण्यात आला असुन, सदर रस्ता रूंदीकरण कामा दरम्यान शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या नवीन पुल हा वाहतुकी खुला आला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ह6ीतील कर्जत - कल्याण असलेल्या मुख्य राज्यमार्ग असलेल्या रस्त्यावरील नेरळ पोलीस ठाणे व वाल्मिकी नगर येथे ब्रिटीश कालीन असे दोन जुने पुल असुन, या दोन्ही पुलाचे बांधकाम हे नेरळ मधील राहाणार जुने ठेकेदार हनिप करीम सय्यद यांनी बांधकाम केले होते. तर या पुलांच्या दोन्ही कामाला साधारण 45 ते 50 वर्ष झाली असुन, या पुलांच्या ठेव्यांचे काम हे दगडीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले होते.
पावसाळ्यामध्ये माथेरानच्या डोंगर रांगातून प्रचंड प्रमाणात वाहाणारा पाण्याचा लोंढा हा या ओढ्यांमधून वाहात उल्हास नदीपात्राला मिळते, मात्र या प्रचंड वाहाणार्या पाण्याच्या लोढयांचा या ब्रिटीश पुलांच्या दगडी बांधकांमाचे ठेवे हे गेले 45 ते 50 वर्ष सामना करीत तग धरून होते. तर नेरळ वाल्मिकीनगर येथी जिर्ण पुलाच्या मधल्या दगडी बांधकामाच्या ठेव्याच्या दगडी या रविवार 29 जून 2025 रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या दरम्यान पाण्याच्या लोंढयामुळे निखलून पडल्याने सदर पूलाची खचण्याचे स्थिती निमार्ण झाली आहे. सदर बाब ही नागरिकांच्या लक्षात आल्याने, व ही माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना मिळताच त्यांनी जागेवरी परस्थितीची पाहणी करून सदर पूल हा तात्काळ वाहतूकीसाठी बंद करून शेजारी बांधण्यात आलेला नवीन पूलावरील पार्किंग केलेल्या बंद गाडया तात्काळ हाटवून, सदर नवीन पूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नागरिकांचा प्रवास हा सुकर झाला आहे.