Kamothe | आठवडी बाजारविरोधात व्यापार्‍यांचे शटरडाऊन

कामोठ्यात शेकडो व्यापार्‍यांचा सहभाग: मनपाच्या धोरणाला विरोध
Kamothe  Shutterdown of traders against weekly market
आठवडी बाजारविरोधात व्यापार्‍यांचे शटरडाऊनPudhari Photo
Published on
Updated on

पनवेल/कळंबोली : शासन, महापालिका, ग्रामपंचायत, वीज वितरण व अन्य शासकीय संस्थांना मालमत्ता कर, इतर टॅक्स, जीएसटी व्यापार्‍यांनी भरायचा अन् शासन आणि महापालिकेने बेकायदा आठवडे बाजार, फिरते व्यापारी, पदोपथावरील दुकानदार यांना मोकाट सोडून त्यांना संरक्षण द्यायचं या महापालिका व शासनाच्या भूमिकेविषयी कामोठ्यामधील व्यापारी मंगळवारी सकाळपासून आक्रमक झाले होते.

आठवडे बाजार कायमचे बंद करण्यासाठी त्यांनी सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ बंद ठेवून शासनाचा जाहीर निषेध केला. अखेरीस महापालिकेचे विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर व्यापार्‍यांनी बंद सायंकाळी चार वाजता मागे घेतला.

कामोठे वसाहतीमध्ये पद पथावरील फिरते व्यापारी, पद पथाच्या बाजूला लावणारे ठेले, तसेच कामोठ्यात भरणारे आठवडे बाजार यामुळे व्यापार्‍यांच्या व्यवसायावर मोठी कुर्‍हाड कोसळत असे. कोट्यावधी रुपयाचे व्यापार्‍यांचे व्यापारासाठी गाळे घ्यायचे किंवा लाखो रुपये भाडे भरून दुकानाचे गाळे घ्यायचे, त्यात शासनाला, महापालिकेला, वीज वितरण कंपनीला, इन्कम टॅक्स, तसेच सर्वत्र टॅक्स भरायचा आणि त्यातून व्यवसाय करायचा. मात्र खुलेआम रस्त्यावर पदोपथावर मोकळ्या जागेवर आठवडे बाजार भरून व्यापार्‍यांच्या धंद्यावर पाणी फिरवायचे. आठवडे बाजार, फिरत्या व्यापार्‍यांनी पदोपथावरील व्यवसायिकांनी कचरा करायचा, प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बेकायदा वापर करायचा, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते आणि कारवाई मात्र जो टॅक्स भरतोय, जीएसटी भरतोय, कर भरतोय त्यांच्यावर करायचे. असा प्रकार शासन, महापालिका गेल्या अनेक वर्षापासून करत आली आहे.

Kamothe  Shutterdown of traders against weekly market
Rain Update | रायगड व पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट

महापालिकेत कडून हातगाडी पद पथावर बसणारे फेरीवाले आठवडे बाजारावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने याकडे कोणीही फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र या आठवडे बाजार फेरीवाले हातगाड्यांमुळे करोडो रुपये खर्च करून व्यावसायिक दुकानाचे गाळे घेतलेले व लाखो रुपये भाडे भरून दुकान स्थापन केलेल्या व्यापारी पुरते मेटाकुटीला आले आहेत. अखेरीस आपला व्यवसाय वाचवायचा कसा यासाठी व्यापार्‍यांनी एकजूट करून महापालिका व शासनाच्या या धरसोड वृत्ती विषयी दुकान बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांना चांगली जागा आली.

अखेरीस व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन येत्या आठवड्याभरात पद पथावरील विक्रेते, हात गाडीवाले तसेच मोकळ्या जागेत भरणारे आठवडे बाजार कायमस्वरूपी बंद करण्याचे ठोस आश्वासन विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी शिष्टमंडळाला दिले.

फेरीवाल्यांच्या विरोधात घोषणाबाजी

मेटाकुटीस आलेल्या व्यापार्‍यांनी अखेरीस संघटना करून शासनाचा व महापालिकेचा निषेध करून आठवडे बाजार कायमचे बंद व्हावे यासाठी मंगळवारी सकाळपासून दुकाने बंद करून आंदोलनाचा पवित्रा व हत्यार उपासले . या आंदोलनात जवळपास कामोठातील साडेचारशे व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी बंद करा, बंद करा आठवड्या बाजार ,फेरीवाले बंद कराच्या घोषणांनी कामोठे परिसर चांगलाच दुमदुमला. अखेरीस अधिकार्‍यांनी असोसिएशनचे अध्यक्ष यांची भेट घेऊन आठवडे बाजार कायमस्वरूपी बंद करण्याचे ठोस आश्वासन दिले.

जर याबाबत ठोस उपाययोजना झाली नाही तर आगामी काळात कायमस्वरूपी कामोठ्यातील बाजारपेठ बंद करून शासन आणि महापालिकेच्या धोरणाविषयी जाहीर निषेध केला जाईल.

नाना मगदूम, कामोठे व्यापारी संघटनेचे प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news