Raigad news | कामोठे पोलिसांच्या ताब्यातील आरोपी फरार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

पनवेल : बाईक चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी कामोठे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Crime News
Nanded Robbery | उमरखेड घरफोडीचा छडा: हैदराबाद येथून दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे पोलिसांनी बाईक चोरीच्या प्रकरणात २७ वर्षीय चंद्रकांत काटकर याला वडाळा येथून अटक केली होती. अटकेनंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिस कोठडीत असतानाच त्याने पोलिसांची नजर चुकवून तेथून पलायन केले. आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Crime News
Sambhajinagar Crime News : मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून

दरम्यान, आरोपी चंद्रकांत काटकर याचे छायाचित्र आणि त्याच्याबाबतची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. या संदर्भात कामोठे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन अधिकृत माहिती देण्यात येईल,” असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news