Panvel Crime : कामोठे परिसरात चोरट्यांनी घातला धुमाकूळ

एकाच रात्री दोन घरे फोडली; ज्वेलरीचे दुकानही लुटले; सीसी कॅमेऱ्यांवर मारले स्प्रे
Kamothe Theft
Kamothe Theftpudhari photo
Published on: 
Updated on: 

पनवेल : कामोठे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन घरफोड्या करण्यासह ज्वेलर्सच्या दुकानावरही डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे सेक्टर ९ मधील मारुती आंगण सोसायटीतील दोन घरांना लक्ष्य केल्यानंतर चोरट्यांनी सोसायटीसमोरील रामेश्वर कॉम्प्लेक्समधील मराठा ज्वेलर्स दुकान फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या घटनांमुळे परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सर्वप्रथम मारुती आंगण सोसायटीतील रूम क्रमांक १०१ आणि १०२ या दोन घरांना लक्ष्य केले. गॅस कटरच्या साहाय्याने घरांच्या दरवाजांची कडी तोडून लॉक बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन घरांमध्ये घुसखोरी केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सोसायटीसमोरील रामेश्वर कॉम्प्लेक्सकडे वळवला.

Kamothe Theft
Bhongawali Substation Project: भोंगवली वीज प्रकल्प होणारच; पोलिसांकडून आंदोलकांना दम

येथील मराठा ज्वेलर्स दुकानाच्या सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी ग्रिल गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आले. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याच्या मालावर आणि रोख रकमेवर डल्ला मारत चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून ते निकामी करण्याचाही प्रयत्न केला.

  • दुकान उघडण्यासाठी व्यापारी आले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. एकाच रात्री दोन घरांमध्ये घुसखोरी आणि ज्वेलर्स दुकानात चोरी झाल्याने कामोठे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गॅस कटरचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आल्याने चोरट्यांनी परिसराची आधीच पाहणी केली होती का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Kamothe Theft
Indapur Voter List Objections: इंदापूरला मतदार यादीतील बोगसगिरी उघड; मोठा गोंधळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.