Kamothe Ceiling Collapse: कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी

धरती व्हिला सोसायटीतही छत कोसळले
Kamothe Ceiling Collapse
Kamothe Ceiling CollapsePudhari
Published on
Updated on

पनवेल: कामोठे परिसरात इमारतींचे छत कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत परिसरात छत कोसळण्याच्या चार घटना घडल्या असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटना ताज्या असतानाच धरती व्हिला सोसायटीतही छताचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरती व्हिला सोसायटीतील अनेक ठिकाणी छताला मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यानंतर छताचा काही भाग कोसळल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Kamothe Ceiling Collapse
Matheran Rain: माथेरानमध्ये धो धो पाऊस, २४ तासांत २३१ मि.मी. विक्रमी नोंद!

मात्र, इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली याशिवाय सोसायटीच्या मागील खाडी परिसरातून साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण आहे.

या सर्व बाबींची नगरसेवक विकास घरत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत इमारतीचे परिसराची स्वच्छता, खाडी परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई आणि साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिबंधासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

Kamothe Ceiling Collapse
Raigad Fishing News: खोल समुद्रातील मासेमारीचा १०२ नाैकांनाच 'एक्सेस पास', उर्वरित वेटींगवर

कामोठ्यात वारंवार घडणाऱ्या छत कोसळण्याच्या घटनांमुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news