Kalamboli Car Crash: कळंबोलीत डॉक्टरच्या गाडीने तिघांना उडवले; चार वाहनांचे नुकसान

भरधाव कार फुटपाथ चढून क्लिनिकला धडकली
Kalamboli Car Crash
Kalamboli Car CrashPudhari
Published on
Updated on

पनवेल शहर: कळंबोली वसातील मधील मुख्य रस्त्यावरून आपल्या इसयुई गाडीने हॉस्पिटलमध्ये जात असताना सत्यम हॉस्पिटलचे मालक संजय बरनवाल यांनी तिघांना उडवत गंभीर जखमी केले आणि सुसाट गाडी रस्त्यावरील फुटपाथ चढून एका दातांच्या डॉक्टरांच्या दवाखान्याला जाऊन धडकली. सदरचा प्रकार हा सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडल्याने प्रचंड मोठा जमाव जमला.

तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित डॉक्टरला त्याच्या अपघाती गाडीसह ताब्यात घेऊन त्यांना कळंबोली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान पादचारी मुलांचा व एका इसमाचा समावेश आहे.

Kalamboli Car Crash
Konkan Railway Upgrade: कोकणरेल्‍वे मार्गाचे दुपदरीकरण होणार

कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटलचे मालक डॉक्टर संजय बरनवाल हे आपल्या एस यु इ या ऑटोमॅटिक मोटर कारने कळंबोली मध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये जात होते.सुधागड विद्या संकुलाच्या दिशेने ते आपल्या हॉस्पिटल कडे जात असताना भवानी दुध डेअरीच्या समोरील एका मोटारसायकला त्यांनी प्रथम उडवले.

त्यानंतर तीन मोटारसायकल उडवल्या. नंतर भांबावलेल्या डॉक्टरने अचानकपणे भरधाव गाडी उजव्या बाजूला वळवल्याने समोरील रस्त्यावरून चालणाऱ्या दोन लहान मुलांनाही त्यांनी जोरात ठोकर मारून उडवले. तसेच फुथपाथच्या बाजूला उभ्या असलेल्या एका स्कुटीला जोरदार धडक मारून स्कुटीचा पूर्ण चक्काचूर त्यांनी केला.

Kalamboli Car Crash
Thane Water Cut: गुरूवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद

त्यामध्ये स्कुटी चालक ही गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा वेग थांबत नसल्याने गाडी रस्त्यावरून फुटपाथ वर चढली व फुटपाथ वरून समोरील सुभाष मिश्रा यांच्या पिनाकी दातांच्या दवाखाना व विजय फोटो स्टुडिओच्या मधील पिलर ला जाऊन धडकली. जर दातांच्या दवाखान्यात घुसली असती तर दवाखान्यामध्ये उभे असलेले पेशंट हे गंभीर जखमी झाले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news