JNPA port e-cigarettes seizure - जेएनपीए बंदरात चार कोटींच्या ई-सिगारेट्स जप्त

१३ हजार ई-सिगारेट्स हस्तगत; जेएनपीए बंदरात डीआरआयची मोठी कारवाई
उरण
उरण
Published on: 
Updated on: 
Summary

मॉप रॉडच्या नावाखाली लपवलेला मुद्देमाल

चालू आर्थिक वर्षात १३५ कोटींपेक्षा जास्त मूल्याचा पकडला साठा

उरण : राजकुमार भगत

महसूल गुप्तचर संचालना लयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई-सिगा रेट्सची आयात खेप रोखण्यात आली. जेएनपीए बंदरात गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या १३ हजार ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या.

उरण
Raigad Rain: मुसळधार पावसाने सायन-पनवेल महामार्ग जलमय; नेरुळ, उरण फाटा परिसरात पाण्याचे तळे, वाहतूक ठप्प

संबंधित मालाची खेप "मॉप रॉड" या उत्पादनाची असल्याचे फसवे पणाने घोषित करण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांनी कंटेनरची काटेकोर तपासणी केली असता, घोषित मालामागे लपवलेल्या ई-सिगारेट्स आढळून आल्या. यामध्ये युटो थैनोस ब्रेडच्या ६ हजार आणि युटो लेन्स ब्रँडच्या ७ हजार ई-सिगारेट्सचा समावेश आहे. ई-सिगारेट्ससोबतचा इतर माल आणि या सर्व वस्तू सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत.

उरण
Raigad News : उरण तालुक्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रकोप

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि नागरिकांना आरोग्याच्या नुकसानीपासून वाचव-ण्यासाठी ई-सिगारेट्स (प्रतिबंध, उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा, २०१९ अंतर्गत भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आणि सर्व इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्सवर बंदी आहे. २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षात डीआरआयने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळ आणि कंटेनर तळांवरून सुमारे ३ लाख ५५ हजार ई-सिगारेट्स जप्त केल्या आहेत. या साठ्याचे एकूण मूल्य १३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

या कारवाईमुळे सीमेपलीकडून होणाऱ्या तस्करीविरोधात लढण्याची, तसेच देशाच्या आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्य हितांचे रक्षण करण्याची डीआरआयची सातत्यपूर्ण वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, संबंधित मालाची खेप "मॉप रॉड" या उत्पादनाची असल्याचे फसवेपणाने घोषित करण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांनी कंटेनरची काटेकोर तपासणी केली असता, घोषित मालामागे लपवलेल्या ई-सि-गारेट्स आढळून आला आहे.

अधिकाऱ्यांनी कंटेनरची काटेकोर तपासणी केली असता, घोषित मालामागे लपवलेल्या ई-सिगारेट्स आढळून आल्या. यामध्ये युटो थेंनोस बँडच्या ६ हजार आणि युटो लेन्स ब्रँडच्या ७ हजार ई-सिगारेट्सचा समावेश आहे. ई-सिगारेट्ससोबतचा इतर माल आणि या सर्व वस्तू सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.