Mahad Jakhmata Temple: महाडच्या जाखमाता देवीचा ऐतिहासिक वारसा! जाणून घ्या प्राचीन महाडशी असलेले नाते

बाणकोट खाडीतील व्यापारी बंदर म्हणून महाडची ओळख; कोट किल्ल्याची रक्षक देवता म्हणून जाखमातेवर भाविकांची श्रद्धा
Mahad Jakhmata Temple
Mahad Jakhmata TemplePudhari
Published on: 
Updated on: 

श्रीकृष्ण बाळ

महाड: प्राचीन काळी बाणकोट खाडीतील एक नामांकित आणि गजबजलेले व्यापारी बंदर म्हणून महाडची ओळख होती. घाटमाथा आणि कोकण यांच्यातील व्यापारी दुवा म्हणून या शहराकडे पाहिले जात असे.

घाटमाथ्यावरून येणाऱ्या विविध वस्तू या बंदरातून जगभर पाठविल्या जात असत. अशा या शहराची ग्रामदेवता म्हणून जाखमाता देवी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या येथील कोट किल्ल्याचे जाखमाता रक्षण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Mahad Jakhmata Temple
Mahad Water Conservation: महाड आणि पोलादपूरमध्ये पाणीटंचाईचा धोका; पाण्याचे नियोजन करण्याची गरज

ऐतिहासिक, सामाजिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले महाड हे सावित्री नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे. क्लॅडियस टॉलेमी या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञ व भूगोल शास्त्रवेत्त्या लेखकाच्या एका ग्रंथामध्ये रायगड जिल्ह्यातील स्थानांचा उल्लेख आहे.

त्याने चौलला ‘शेमुल’, गोरेगावला ‘हिप्पोकुर साऊथ ऑफ शेमुल’ आणि महाडला ‘बालेपाटना’ म्हटले आहे. टॉलेमीच्या काळाच्या पूर्वीपासून महाडचा ग्रीकशी व्यापारी संबंध होता. इ.स. पूर्व २२५ इतक्या जुन्या नोंदीतही महाड या व्यापारी बंदराचा उल्लेख आढळतो. पूर्वी हे शहर महिकावती नावाने प्रसिद्ध होते.

Mahad Jakhmata Temple
Chaul Sheetalamata Temple: भक्तांना कौल देणारे चौलचे शीतलामातेचे जागृत देवस्थान

कुंभोजवंशीय बुद्धधर्मीय राजा विष्णू पुलित याचे इ.स.च्या पहिल्या शतकात येथे राज्य होते. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचा या भूभागावर अंमल होता. त्यावेळी महाडचे व्यापारी महत्त्व खूप होते.

मोठी बाजारपेठ म्हणून या नगरीला महा–हाट म्हणत. त्याचे पुढे महाड झाले. पोर्तुगीजांच्या लिखाणात या शहराचा उल्लेख गव्हाची बाजारपेठ म्हणून आलेला आहे. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर येथून गहू, कापड व विविध प्रकारचे अलंकार महाबळेश्वरमार्गे येथे येत व येथून समुद्रमार्गे ते जगभर पाठविले जात असते.

महाड शहराच्या बाजारपेठेजवळ असलेल्या कोट किल्ल्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ जाखमातेचे मंदिर आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स. १७४० ते १७६१) त्यावेळचे पेशवाईतील रायगडचे सुभेदार व महाडचे रहिवासी यशवंत महादेव पोतनीस यांनी वीरेश्वर मंदिरासोबतच जाखमाता मंदिराची मराठा स्थापत्यशैलीनुसार नव्याने बांधकाम केल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news