Investment fraud : गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक

माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Investment fraud
गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूकFile Photo
Published on
Updated on

माणगाव : तालुक्यातील नानोरे येथे अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 28 लाखांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायगड जिल्हयात ऑनलाईन फसवणूक, अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस भाग पाडून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार रायगड जिल्ह्यात सुरुच आहे. असाच प्रकार माणगाव तालुक्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार माणगाव पोलीस ठाणे हद्दीत 20 ऑगस्टे 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

Investment fraud
Raigad News : बदलेल्या निसर्गचक्रामुळे शेतकरी- बागायतदार चिंतेत

फिर्यादी रा. निवास मुंबई गोवा हायवे, नानोर, माणगांव यांस त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन करुन नुवमा वेल्थ मॅनेजमेन्ट लिमिटेड कंपनीच्या ऑफीसमध्ये बोलत आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवरती लिंक पाठवुन फिर्यादी यांना ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. सदर ॲप्लीकेशनव्दारे ट्रेडिंग साईटवरती एकुण 27 लाख 96 हजार 851 रूपये गुंतवण्यास लावले. त्या मोबदल्यात 30 टक्के जास्तीचा परतावा देणार असल्याने बोलुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी यांना आजपावेतो कोणताही आर्थिक परतावा तसेच गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता फसवणुक केली. याबाबत माणगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनी निवृत्ती बो-हाडे हे करीत आहेत.

Investment fraud
Mahad Municipal Council : प्रशासकीय काळातील विकास कामे ठरणार कळीचा मुद्दा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news