Yashashri Shinde Murder Case | आधी प्रेमसंबंध, मग दुरावा आणि शेवट हत्त्येत

यशश्री'च्या हत्या प्रकरणातील इन्साईट स्टोरी
Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
आधी प्रेमसंबंध, मग दुरावा आणि शेवट हत्त्येत (Image source- X)
Published on
Updated on

रायगड ः यशश्रीसमवेत जुळलेले प्रेम संबंध, त्यातून निर्माण झालेली जवळीक, याच प्रकरणावरून झालेली शिक्षा आणि यशश्रीचे अऩ्य युवकासमवेत सुरु असलेले लव अफेर या प्रकारामुळे संतापलेल्या दाऊद शेखने यशश्रीची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित दाऊद शेख याला मंगळवारी अटक केल्यानंतर याबाबी उघड झाल्या आहेत. इतक्या निर्घृणपणे त्याने तिची हत्या का करावी याचा शोध पोलीस घेत आहेत. (Yashashri Shinde Murder Case)

उरण शहरात राहणारी यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 26 जुलै रोजी समोर आली. 25 जुलै रोजी यशश्री बेलापूर येथे कामावर गेली ती संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्याने तीच्या नातेवाईकांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. दुसर्‍या दिवशी तिचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत कोटनाका परिसरात आढळून आला होता. यशश्रीच्या नातेवाईकांनी एक विशिष्ठ धर्माच्या तरुणावर संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचे पडसाद जिल्हयासह राज्यभर उमटू लागले. रायगड जिल्हयात ठिकठिकाणचे नागरिक रस्त्यावर उतरले. हा लव जिहादचा प्रकार असल्याचा दावा काहींनी केला. पोलीसांनी आरोपीसा तातडीने अटक करूऩ कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मोर्च आंदोलनांमधून होऊ लागली.

नवी मुंबई पोलीसांनी वेगवेगळी आठ पथके तयार करून आरोपींचा माग घेण्यास सुरुवात केली. अखेर मंगळवारी नवी मुंबई पोलीसांनी दाऊद शेख या संशयित तरुणाला कर्नाटकातून ताब्यात घेतले. दाऊदने या घटनेला दुजारा दिला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांकडुन देण्यात येत आली. दाऊद याच्या पुढील तपासात हत्त्येच्या घटनेमागील कारणे समोर येतील मात्र यशश्री दाऊद प्रेमाच्या जाळ्यात सापडली का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
Yashshri Shinde murder case | यशश्री शिंदेचा मारेकरी सापडला, कर्नाटकातून केली अटक

शालेय जीवनापासून दोघांची जवळीक

मिळालेल्या माहितीनुसार यशश्री ही उरण शहरातील एनआय परिसरात तर दाऊद शेख हा बोरी येथे राहात होता. शालेय जीवनापासून या दोघांची जवळीक असल्याची माहिती सांगितली जाते तर यशश्री आणि दाऊद यांची ओळख एका कंपनीत काम करीत असल्यामुळे झाली होती. यामुळे 2019 मध्ये दाऊदवर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल झाला होता. हाच राग दाऊदच्या मनात होता. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. मात्र घटना घडली त्या दिवशी त्यांचा संपर्क झाला होता. त्यांचे भेटण्याचं त्यांचं ठरलं आणि दाऊदने यशश्रीची निर्घृणपणे हत्या केली. यशश्रीसमवेत जुळलेले प्रेम संबंध, त्यातून निर्माण झालेली जवळीक, याच प्रकरणावरून झालेली शिक्षा आणि यशश्रीचे अऩ्य युवकासमवेत सुरु असलेले लव अफेर या प्रकारामुळे संतापलेल्या दाऊद शेखने यशश्रीची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अनेक घटनांचा उलगडा (Yashashri Shinde Murder Case)

हत्येनंतर ही घटना लव्ह जिहादची घटना असल्याचा दावा विविध स्तरातून होत राहिला. यामुळे या प्रकरणाला जातीय स्वरुप येते की काय, अशी शक्यता वर्तविली जात होती.पण आरोपीला अटक झाल्यावर याबाबतचा खुलासा होऊ लागला आहे.पोलिसांनीही ही घटना लव्ह जिहादसारखी नसल्याचे ठामपणे सांगीतले. आरोपीचे यशश्रीसमवेत असणारे संबंध त्यातून निर्माण झालेली मैत्री,त्यात आलेला दुरावा,त्याला झालेली शिक्षा ,यशश्रीचे अन्य युवकाशी जुळलेले सूर हे सारे त्याला आठवत होते.त्यातून त्याची बैचिनी वाढत झाली आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याने हे अखेरचे टोक गाठले असावे,असा कयास पोलिसांनी लावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news