Yashshri Shinde murder case | यशश्री शिंदेचा मारेकरी सापडला, कर्नाटकातून केली अटक

उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली होती
Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
नवी मुंबई येथील यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

नवी मुंबई येथील २० वर्षीय यशश्री शिंदे खून प्रकरणी (Yashshri Shinde murder case) आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh) याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. त्याला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. यशश्री शिंदे ही २५ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती आणि त्यानंतर शनिवारी तिचा मृतदेह नवी मुंबईतील उरण येथील रेल्वे स्थानकाजवळील झुडपात सापडला होता. उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला होता. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन त्याने तिचा खून केला.

Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
Yashshree Shinde : यशश्रीच्या मारेकर्‍याला तत्काळ अटक करा; उरणमध्ये संतप्त मोर्चा

यशश्रीची अत्यंत क्रूरपणे हत्या

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आणि चाकूने वार केल्याच्या जखमा आढळल्या होत्या. यातून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याचे दिसून आले होते. यशश्री शिंदे २५ जुलैपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह उरणमधील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळला होता. तिचा चेहरा, शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. तिच्या गुप्तांगावर चाकूने वार करण्यात आले होते.

यशश्रीचा खून करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तो सतत लोकेशन सतत बदलत होता. पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

पोलिसांना फोन कॉल डिटेल्स मिळाले

यापूर्वी या प्रकरणी कर्नाटकातील मोहसीन नावाच्या एका व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो यशश्रीच्या सतत संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना फोन कॉल डिटेल्सवरून मिळाली होती. मोहसीनला आज अधिक चौकशीसाठी उरण येथे आणले जाण्याची शक्यता आहे.

फाशीची शिक्षा देण्याची मागणी

उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी उरण, पनवेलमध्ये उमटले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बंदची हाक देत आपला संताप व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा दिली जावी, जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशा मागण्या पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

Yashshri Shinde murder case Dawood Shaikh
Thane Love Jihad News | मीरारोडमध्ये लव्ह जिहादचा प्रकार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news