Seafood Export: मत्स्योत्पादनात मुंबईसह रायगड, रत्नागिरीचा दबदबा

वर्षभरात कोकण किनारपट्टीवर 9 हजार कोटींची उलाढाल
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

रायगड: युद्ध परिस्थिती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने यावर मात करत भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 72,325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. मरीन प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या (एमपीईडीए) आकडेवारीनुसार, देशाच्या या यशात महाराष्ट्राच्या, विशेषतः कोकण किनारपट्टीचा सिंहाचा वाटा आहे.

राज्य मत्स्यव्यवसाय विभाग आणि सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) च्या अहवालानुसार, महाराष्ट्राच्या सागरी निर्यातीमुळे देशाच्या तिजोरीत तब्बल 7,343 कोटी 41 लाख रुपयांचे परकीय चलन जमा झाले आहे.

Fish
Sanitation workers Maharashtra: मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना दिलासा; राज्य आयोगाने प्रलंबित प्रकरणांचा मागवला अहवाल

या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे एकूण सागरी मत्स्योत्पादन 3 लाख 10 हजार 777 मेट्रिक टनांवर पोहोचले असून, कोकणात सुमारे 8,500 ते 9,000 कोटी रुपयांची भव्य आर्थिक उलाढाल झाली आहे.

Fish
Mumbai University Admission: पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत कट-ऑफमध्ये घट!

जागतिक बाजारपेठेत भारताच्या गोठवलेली कोळंबीचा (फ्रोझन श्रिम्प) निर्यातीत दोन-तृतीयांशपेक्षा अधिक वाटा आहे. कोकणातून निर्यात झालेल्या एकूण मत्स्यसाठ्यात कोळंबीचा वाटा 65 टक्के आहे.

कोळंबीसोबतच कोकणतील पांढरे-काळे पापलेट, सुरमई, बांगडा, स्क्विड आणि रिबन फिश यांची मुंबईतील ससून डॉक व उरणच्या जेएनपीए बंदरातून विक्रमी निर्यात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news