Mahad ST Bus | महाडमध्ये पाच नवीन एसटी बसचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण

Bharat Gogavale | महाडमधील नवीन एसटी मार्गांसाठी गणपतीनंतर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल
Mahad New ST Bus Inauguration
एसटी बसेसचे लोकार्पण मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Mahad New ST Bus Inauguration

महाड : महाड आगारासाठी नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पाच एसटी बसेसचे लोकार्पण मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज (दि.२१) करण्यात आले. प्रवाशांना अपुऱ्या बसेसमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्याची मागणी होत होती. अखेर याची गंभीर दखल घेत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाडमधील नवीन एसटी मार्गांसाठी गणपतीनंतर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्यात मंत्री गोगावले यांनी महाडमध्ये चालक-वाहकांची संख्या अपुरी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जिल्हा एसटी व्यवस्थापन आणि परिवहन मंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून आवश्यक चालक-वाहकांची भरती लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.

Mahad New ST Bus Inauguration
Raigad steps route : रेड अलर्ट असेल तरच रायगड पायरी मार्ग बंद

एसटी गाड्यांमधील सर्व आसनांवर सुरक्षा बेल्ट नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मंत्री गोगावले यांनी ड्रायव्हर आणि शेजारच्या सीटपासून सुरुवात करून, सर्व आसनांवर सुरक्षा बेल्ट बसवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, तालुकाप्रमुख बंधू तरडे, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय सावंत, माजी सभापती सपना मालुसरे, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, नितीन आरती, दीपक सावंत, उपसर प्रमुख अमित शेट्टी, युवासेना पदाधिकारी सिद्धेश मोरे, राजू पावले आदीसह नागरिक उपस्थित होते.

Mahad New ST Bus Inauguration
महाड एमआयडीसीतील कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मंत्री गोगावले यांनी महाड आगारातील स्वच्छतागृहाच्या स्थितीबाबत नगरपरिषद आणि एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नवीन गाड्यांच्या मागणीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत मार्ग नूतनीकरणाचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news